भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणेंचा राजीनामा घ्या ; युवा सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पोलिसांच्या मार्फत दिले निवेदन

0 minutes, 1 second Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणेंचा राजीनामा घ्या ; युवा सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे पोलिसांच्या मार्फत दिले निवेदन

मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत असतात. नितेश राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी समाजामध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत. आपले मंत्री पद टिकण्यासाठी व आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशी वक्तव्य करतात, पण नितेश राणे अशी भडकाऊ वक्तव्य करत असल्यामुळे राज्यातील मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत असतात.

नितेश राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी समाजामध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करत आहेत. आपले मंत्री पद टिकण्यासाठी व आपल्या वरीष्ठांना खुश करण्यासाठी अशी वक्तव्य करतात, पण नितेश राणे अशी भडकाऊ वक्तव्य करत असल्यामुळे राज्यातील युवक भडकले जातील व हेच युवक कुठेतरी विनाशकारी मार्गाकडे वळतील. याचा विचार नितेश राणेंना नाही का? असा सवाल युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी उपस्थित केला आहे. अशी असंवेदनशील वक्तव्य करून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री राणे नितेश यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी देखील नाईक यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या रोजगाराचा, युवकांची वाढत चाललेली बेकारी या बद्दल मंत्री राणे हे कधी बोलत नाहीत. पण रोज सकाळी उठून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य कायम करत असतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण बेरोजगार, ठेकेदार यांची देणी बाकी आहेत. जे राज्यसरकार द्यायचे आहे, त्याबद्दल राणे कधीच बोलताना दिसून येत नाहीत. राज्यातील युवकांची बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता यावर नितेश राणे कधी भाष्य करताना दिसून येत नाहीत, यावरून नितेश राणे यांना शांत असलेले राज्य हे अशांततेच्या मार्गांवर घेऊन जायचे आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. रोज उठून अशी भडकाऊ वक्तव्य करून दंगली घडवण्याच्या यांचा उद्देश असेल तर अश्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली पोलीस प्रशासनास करण्यात आली. पोलीस प्रशासनाने ही मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवावी अशी देखील मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, गुरु पेडणेकर, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, मंगेश राणे, अविनाश सावंत, आशिष मेस्त्री, चेतन गुरव उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *