देवगड (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर २०२४ स्पर्धेच्या युगात अभियंत्याचे संघटन महत्त्वाचे ; अभियंता ही निसर्गातील वेगळी शक्ती – उदयकुमार महाजनी आजच्या स्पर्धेच्या युगात अभियंत्यांचे संघटन महत्वाचे असुन व्यवसायात स्पर्धा जरुर असावी,पण कामात एकमेकांच्या सहकार्याने दर्जा राखून नाव कमवावे. अभियंता हा निसर्गातील वेगळी शक्ती आहे.जग घडवण्याचं महत्वाचे काम अभियंता करतो,असे प्रतिपादन ग्रामीण पाणीपुरवठा ग्रामीण […]
देवगड : प्रतिनिधी १४ सप्टेंबर २४ नाद पियाळी नदीकिनारी आढळला वृद्धाचा सडलेला स्थितीत मृतदेह तो मृतदेह असलदे येथील दोन महिन्यापूर्वीतो बेपत्ता असलेल्या धाकू मयेकर यांचा असल्याची पटली खात्री कणकवली तालुक्यातील दोन महिन्यापुर्वी असलदे दिवाण सानेवाडी येथून बेपत्ता झालेल्या धाकू लक्ष्मण मयेकर(७५) या वृध्दाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा.सुमारास […]
शिरगाव (प्रतिनिधी) १२ सप्टेंबर २०२४ आमदार नितेश राणे यांनी घेतले शिरगांवच्या राजाचे कृपार्शिवाद कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील ७६ वर्षांची परंपरा असलेल्या एकमेव सार्वजनिक गणपती शिरगांवच्या राजाचे शुक्रवारी कृपाशिर्वाद घेतले. आमदार नितेश राणे यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत शिरगांव बाजारपेठ येथे स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने अध्यक्ष […]
देवगड (प्रतिनिधी)१२ सप्टेंबर २४ कट्टा महात्मागांधी तंटामुक्त गाव सामिती अध्यक्षपदी दयानंद शेडगे यांची पुन्हा बिनविरोध निवड देवगड तालुक्यातील कट्टा गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी श्री दयानंद लवू शेडगे यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करणेत आली. कट्टा ग्रामपंचायतची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली या ग्रामसभेत त्यांची बिनविरोध सर्वानुमती निवड करण्यात आली.यावेळी सरपंच श्रीम. […]
देवगड (प्रतिनिधी)१२ सप्टेंबर २०२४ देवगडात स्वच्छ माझे अंगण अभियानाला प्रारंभ : देवगड तालुक्यातील सर्व कुटुंबांनी सहभाग घ्यावा गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांचे आवाहन देवगडात सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात १ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ” स्वच्छ माझे अंगण ” हे अभियान राबविण्यात येणार आहे . त्यामुळे देवगड तालुक्यातील सर्व कटूंबांनी या अभियानात सहभाग […]
देवगड (प्रतिनिधी) १२ /९/२४ HPCL कंपनीच्या सुधारित आदेशान्वये गॅस वितरण प्रणालीमध्ये नवीन बदल प्रत्येक गॅस ग्राहकाने तात्काळ E-KYC प्रत्यक्ष कार्यालयात येऊन (सोबत आधार कार्ड गॅस कार्ड) अथवा HP-PAY मोबाईल ॲप्लिकेशन पूर्ण करून घ्यावे तरच यापुढे सर्वांना गॅस वितरीत सुरळीत होईल असे आव्हान गॅस एजन्सी मार्फत ग्राहकांना करण्यात येत आहे .सिंधुदुर्ग जिल्हा गॅस डीलर असोसिएशन सिंधुदुर्गची […]
देवगड दि. १२ (स्वप्नील लोके) मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात जामसंडे मोरेश्वर गोगटे हायस्कूलची सलग दुसऱ्या वर्षीही जिल्हास्तरावर निवड मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ या अभियानात श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर, जामसंडे या प्रशालेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २ अभियानांतर्गत स्पर्धेत […]
देवगड – प्रतिनिधी आंबेरी चेकपोस्ट नजीक अपघात ; नॅनोकारची रिक्षाला धडक रिक्षामधील दोन प्रवासी गंभीर देवगड तालुक्यातील आंबेरी पोलीस दूरक्षेत्रनजीक नॅनो कारची रिक्षाला धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षामधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. रशीद शहाबुद्दीन सय्यद (७०, रा. गिर्ये) व रवींद्रनाथ जयराम देवळेकर (६०, रा. गिर्ये) अशी जखमींची नावे आहेत. तर […]
संदीप जाधव यांना पितृशोक देवगड- प्रतिनिधी जामसंडे प्रबुद्धनगर येथील तुकाराम सावळाराम जाधव (८६) यांचे रविवारी सायंकाळी ५.३० वा. वृद्धापकाळाने निधन झाले. जामसंडे येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. उमा मिलिंद पवार हायस्कूलचे (इंग्लिश मीडियम स्कूल, देवगड) शिक्षकेतर कर्मचारी संदीप जाधव यांचे ते वडिल होत.
देवगड (प्रतिनिधी) ४ सप्टेंबर २०२४ नाडन येथील 22 वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या देवगड तालुक्यातील नाडण पुजारे वाडी येथील पराग गणेश पुजारे या २२ वर्षीय युवकाने राहत्या घरी स्वयंपाक घरावरील माळ्यावर नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ७:३० च्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाडन पुजारेवाडी येथील पराग […]
