स्पर्धेच्या युगात अभियंत्याचे संघटन महत्त्वाचे ; अभियंता ही निसर्गातील वेगळी शक्ती – उदयकुमार महाजनी

 

देवगड (प्रतिनिधी) १५ सप्टेंबर २०२४

 

स्पर्धेच्या युगात अभियंत्याचे संघटन महत्त्वाचे ; अभियंता ही निसर्गातील वेगळी शक्ती – उदयकुमार महाजनी

 

आजच्या स्पर्धेच्या युगात अभियंत्यांचे संघटन महत्वाचे असुन व्यवसायात स्पर्धा जरुर असावी,पण कामात एकमेकांच्या सहकार्याने दर्जा राखून नाव कमवावे. अभियंता हा निसर्गातील वेगळी शक्ती आहे.जग घडवण्याचं महत्वाचे काम अभियंता करतो,असे प्रतिपादन ग्रामीण पाणीपुरवठा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उदयकुमार महाजनी यांनी देवगड येथे केले ते देवगड येथे अभियंता दिन कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

 

      देवगड तालुका अभियंता ठेकेदार संघटनेच्यावतीने  इंद्रप्रस्थ हाँल देवगड येथे १५सप्टेंबर ‘अभियंता दिन’ सर मोक्षगुंडंम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला.सर विश्वेश्वरय्या यांचा जिवनपट इंजि.दिलीप कदम यांनी मांडला, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वास्तुनिर्मितीसाठी योगदान देणारे हिरोजी इंदुलकर यांच्या कामाची आठवण करून दिली.सदर कार्यक्रमास उदयकुमार महाजनी , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सिंधुदुर्ग , संघटनेचे अध्यक्ष इंजि.महेंद्र माणगांवकर, सरचिटणीस इंजि.दिलीप कदम तर महिला प्रतिनिधी म्हणून इंजि.रसिका सारंग विचार मंचावर होते.

 

      यावेळी महिला ठेकेदार व्यवसायात काम करताना सर्वजण चांगले सहकार्य करतात म्हणून काम करणं शक्य होतं!असं असे मात्र रसिका सारंग यांनी व्यक्त केले तर संघटनेच्या सर्व प्रकारच्या अडचणीत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची व शेवटच्या सभासदाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहाण्याचा विश्वास अध्यक्ष महेंद्र माणगांवकर यांनी व्यक्त केला.

 

यावेळी अभियंता दैनंदिनीचे प्रकाशन झाले तसेच २०२४ चा आदर्श अभियंता पुरस्कार लघुपाटबंधारे विभागाचे उप अभियंता मा.इंजि.वसंत मोहिते यांना देण्यात आला.बिपीन कोरगांवकर यांनी प्रास्ताविकात, संघटनेच्या कामकाजाचा गेल्या २०/२२वर्षाचा लेखाजोखा मांडला., आणि संघटनेचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी समिर पेडणेकर, हेमंत देसाई, उपाध्यक्ष रणजित जाधव, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सदाशिव सरोळकर, श्रीकांत घोटगे,रवी चव्हाण, मंगेश रजपूत, लक्ष्मण सूळ,प्रसन्न कदम,वैभव राणे,आशिष जाधव आदी इंजिनिअर ठेकेदार उपस्थित होते.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनिअर दिलीप कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार रणजित जाधव यांनी व्यक्त केले.

 

अभियंता दिनानिमित्त दिविजा वृध्दाश्रम असलदे येथे अन्नदान करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप देखील करण्यात आले

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *