HPCL कंपनीच्या सुधारित आदेशान्वये गॅस वितरण प्रणालीमध्ये नवीन बदल

देवगड (प्रतिनिधी) १२ /९/२४

HPCL कंपनीच्या सुधारित आदेशान्वये गॅस वितरण प्रणालीमध्ये नवीन बदल

प्रत्येक गॅस ग्राहकाने तात्काळ E-KYC प्रत्यक्ष कार्यालयात येऊन (सोबत आधार कार्ड गॅस कार्ड) अथवा HP-PAY मोबाईल ॲप्लिकेशन पूर्ण करून घ्यावे तरच यापुढे सर्वांना गॅस वितरीत सुरळीत होईल असे आव्हान गॅस एजन्सी मार्फत ग्राहकांना करण्यात येत आहे .सिंधुदुर्ग जिल्हा गॅस डीलर असोसिएशन सिंधुदुर्गची तातडीची सभा देवगड येथे संपन्न झाली. यावेळी जिल्हा असोसिएशन अध्यक्ष माजी आमदार तथा चेअरमन देवगड तालुका खरेदी विक्री संघ अजित गोगटे ,सचिव ऍड नंदन वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष नंदकिशोर करावडे, अनुप तेली, आदिनाथ जैन डॉ वंदन वेंगुर्लेकर, महेंद्र पारकर आदी उपस्थित होते.
भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच एचपीसीएल HPCL कंपनीच्या सुधारित आदेशान्वये गॅस वितरण प्रणाली मध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. भविष्यात प्रत्येक गॅस ग्राहकाने स्वतःच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरूनच बुकिंग केले पाहिजे. तसेच त्याच्या मोबाईल मधील मेसेज बॉक्स मध्ये आलेला अचूक OTP नंबर ग्राहकाने डिलिव्हरी बॉयकडे दिल्यानंतरच गॅस वितरण करण्यात येईल . प्रत्येक गॅस ग्राहकाने स्वतःच्या गॅस कनेक्शन चे सेल्फी चेक आमच्या अधिकृत मेकॅनिक कडूनचं तात्काळ भरून घेणे अनिवार्य आहे. सेफ्टी चेक न केल्यास विपरीत घटना घडल्यास संबंधित ग्राहक स्वतः जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *