हिंदळे भंडारवाडी येथील अरुण साबाजी सावंत (वय 57 वर्षे) हे 23 मे रोजी सायंकाळी 4.30 वा. पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा मुलगा नितीन अरुण सावंत यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण सावंत हे हिंदळे सडेवाडी येथील आप्पा रामचंद्र सडेकर हे मयत झाल्याने त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जातो असे आपले पत्नीला सांगून घरातून निघून गेलेले होते. ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांची शोधाशोध करण्यात आली. मात्र ते सापडू शकले नाहीत, असे फिर्यादित म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देसाई करीत आहेत.