देवगड (प्रतिनिधी) देवगड बंदर येथे मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची विक्री ; उद्योगपती नंदकुमार घाटे, मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी व मच्छिमारांनी पोलिस प्रशासनाला धरले धारेवर गोवा बनावटीच्या दारूचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट असून देवगड बंदर परिसरात ही दारू मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे विक्री केली जात आहे.जेटी भागात स्टॉलवर खुलेआमपणे विक्री होत असतानाही पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत […]
देवगड वाघोटन येथील आंबा बागायतदार उमेश तेली यांचे निधन वाघोटण येथील आंबा बागायतदार उमेश जनार्दन तेली यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. भाजपाचे पडेल मंडल प्रभारी डॉक्टर अमोल तेली यांचे ते बंधू होते, तर आंबा बागायतदार जनार्दनशेठ तेली यांचा तो मुलगा होता. उमेश हे अत्यंत सुसंवादी आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. देवगड तालुक्यात […]
देवगड (प्रतिनिधी) पंचायत समिती देवगड तर्फे नारी शक्तींचा सन्मान नवरात्रोत्सवानिमित पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांचा महिला कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक विभागातील महिलां प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांअंतर्गत संध्याकाळी खास महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ( गरबा ) चे आयोजन करण्यात आले होते या सांस्कृतिक कार्यक्रमात गटविकास अधिकारी वृक्षाली […]
देवगड / प्रतिनिधी आनंदवाडी बंदर जेटीतील गाळ १५ दिवसात न काढण्यास नगरसेवक तारी बसणार फिशरीज कार्यालयासमोर उपोषणाला देवगड- आनंदवाडी बंदरातील जेटी प्रकल्पाचे काम गेली दहा वर्षे सुरू आहे. या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात भरावाचे काम केल्यामुळे खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ तात्काळ काढण्यात यावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना […]
देवगड (प्रतिनिधी) झोपी गेलेला आमदार निवडणुका आल्यावर झाला जागा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आमदार राणेंवर बोचरी टीका दहा वर्षे आमदार असूनही पुलासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही शिवाय आपल्याच पक्षातील नेत्यांची मागणी असलेला वळकुवाडी वरंडवाडी पूलाचा प्रश्न देखील ते अद्याप सोडू शकले नाही विधानसभा निवडणुका समोर आल्यावर दहा वर्षे झोपी गेलेले आमदार नितेश […]
कणकवली दि ७ ऑक्टोबर (तुळशीदास कुडतरकर) कणकवली शहरातील नवरात्री उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती छत्रपती शिवाजी महाराज नगर, कनकनगर व ओंकार मित्र मंडळ मधलीवाडी,परबवाडी येथील नवरात्री उत्सवास दिली भेट कणकवली शहरातील नवरात्री – दांडिया उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली भेट. छत्रपती शिवाजी महाराज नगर, कनकनगर व ओंकार मित्र मंडळ […]
देवगड : प्रतिनिधी देवगड युवती छेडछाड प्रकरणातील अटक पाच संशयितांना सिंधुदूर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर ; मुख्य संशयितास अद्याप जामीन नाहीचं देवगड येथील युवती छेडछाड विनयभंगप्रकरणी अटक झालेल्या संशयितांपैकी पाचजणांना सिंधुदूर्ग अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.याकामी संशयित पोलिस कर्मचाऱ्याच्यावतीने अॅड.कौस्तुभ मराठे व अॅड.उमेश सावंत यांनी यशस्वी युक्तीवाद केला. […]
देवगड (प्रतिनिधी) गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुरुकुल गुणगौरव सोहळा रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी भवानी मंगल कार्यालय चांदोशी येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या गुणगौरव सोहळ्यात राज्यस्तरावर गोल्ड मेडल प्राप्त शर्वरी तायडे,नम्रता सोनटक्के, स्वरा शिंदे ,जिया मांजरेकर,रिया कारेकर ,संस्कृती चोपडे यांचा तसेच जिल्हास्तरावर सिल्व्हर मेडल प्राप्त निल […]
विजयदुर्ग (दीपक करंजे) युनेस्कोच्या अधिकारी वर्गाने आज केली विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी ; ग्रामस्थांशी साधला सुसंवाद. विजयदुर्ग किल्ल्याचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात नामांकन झाल्यानंतर आज प्रत्यक्षात युनेस्कोच्या टीमने सकाळी 10 च्या सुमारास विजयदुर्ग किल्ल्याला भेट दिली. यामध्ये युनेस्कोचे जापनीज अधिकारी Mr. Hwajong Lee, राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे, […]
देवगड- प्रतिनिधी देवगड येथे नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून मुलींसाठी कराटे प्रशिक्षण ; युवर फिटनेस क्लब- देवगड व शेवंता नाईक ब्लॅक बेल्ट यांच्यामार्फत केले आयोजन नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून युवर फिटनेस क्लब- देवगड व शेवंता नाईक ब्लॅक बेल्ट यांच्यामार्फत देवगड शेठ म. ग. हायस्कूल येथे मुलींसाठी बेसिक कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. देवगड येथील युवतीवर […]
