पालकमंत्री राणे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी श्री. देव स्वयंभू, रवळनाथ मंदिरात व प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळी फूल उचलून हा आरोप सिद्ध करून दाखवावा. मंत्री राणे यांनी आरोप सिद्ध करून दाखविल्यास मी नगराध्यक्षपदाच्या रिंगणातून माघार घेई.त्यांनी हा आरोप सिद्ध न केल्यास पालकमंत्रीपदाचा नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा.
कणकवली | समीर नलावडे व संदेश उर्फ गोट्या सावंत यांना पदे नाही दिली तर हे दोघेही आपली साथ सोडून शिंदे शिवसेनेत प्रवेश करतील, याची भीती पालकमंत्री नितेश राणे यांना आहे. नितेश राणे हे डरपोक मंत्री आहेत. मी भाजपप्रवेशासाठी ३० कोटी मागितले होते, असा आरोप मंत्री राणे यांनी माझ्यावर केला आहे. मंत्री राणे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी श्री त्यांनी श्री देव स्वयंभू, रवळनाथ मंदिरात व प. पू. भालचंद्र महाराज यांच्या समाधी स्थळी फूल उचलून हा आरोप सिद्ध करून दाखवावा, हा आरोप मंत्री राणे यांनी सिद्ध करून दाखविल्यास मी नगराध्यक्षपदाच्या रिंगणातून माघार घेईन. त्यांनी हा आरोप सिद्ध न केल्यास पालकमंत्रीपदाचा नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले.
भाजपच्या प्रचार कार्यालयाच्या कमानीवरील बॅनरवरील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम. निलेश राणे यांचा फोटो काढून शिवसैनिकांची मने दुखविण्याचे काम भाजपने केले, असा आरोप पारकर यांनी केला.
माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, सतीश सावंत, संजय आग्रे, मेहुल धुमाळे, विजय इंगळे आदी उपस्थित होते.
पारकर म्हणाले, नितेश राणे यांची सोमवारी सायंकाळी झालेली परिषद ही पराभवाची आहे. भाजपने न. पं. निवडणुकीत मतदारांना पैशांचे वाटप केले.
मात्र, शहरातील जनता स्वाभिमानी असल्याने ती विकली जात नाही, हे पालकमंत्र्यांनी लक्षात आल्यानंतर मंत्री राणे हे संदेश पारकर यांना विकत घेण्याची भाषा करत आहेत. नितेश राणे हे सिंधुदुर्गाच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर मंत्री राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास जाते होते. मी त्यांना कणकवली विधानसभा लढविण्याचा मी सल्ला दिला. मंत्री माझ्याबद्दल गैरसमज पसरवत आहेत.
सत्ताधाऱ्यांचा अनिल पवार नावाचा ठेकेदार पाटनर आहे. निवडणुकात हा ठेकेदार पैसे वाटण्याचे काम करीत आहेत. भ्रष्ट्राचारी टोळीचा बीमोड करण्याचा निर्धार कणकवली शहरातील जनतेने केला आहे. भाजपच्या विरोधात जनता कौल देणार आहे. याची चाहूल मंत्री नितेश राणे यांना लागल्याने ते माझ्याबाबत गैरसमज पसरवत आहे. मी व शहरातील जनता स्वाभिमानी आहे.
विकासाच्या मुद्द्यावर मी आणि नगरसेवकपदाचे उमेदवार निवडून येतील. शहरातील जनता ही राजकीय परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. शहर विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शहरच्या विकासाची जबाबदारी आमची आहे, कणकवली भय, भ्रष्ट्राचारमुक्त करणे ही आमची जबाबदारी असून कणकवली शहराचा सर्वांगीण विकास करणे हा आघाडीचा अजेंडा आहे.
पालकमंत्री नितेश राणे हे पराभवाच्या मानसिकतेतून माझ्याविरोधात बोलत आहेत. कणकवली शहराची सत्ता आघाडीच्या हाती द्या, विकासाचे व्हिजन ठेवून कणकवली शहर आदर्श शहर बनवले जाईल. सत्ताधारी पराभूत झाले की नितेश राणे यांचे मंत्रीपद धोक्यात येणार आहे. खा. नारायण राणे यांचा बंगला जाळणारा मुख्यसूत्रधार कोण होते, हे पालकमंत्र्यांना माहित आहे.
त्या सूत्रधारालाच नगराध्यक्षपदाचे उमेदवारीचे तिकीट देता, यावरुन पालकमंत्री डरपोक आहे, हे सिद्ध होत आहे. मी कणकवली शहराच्या मातीत जन्मलो आहे, मी लढणार माणूस आहे. शहर विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर कणकवली शहराला व शहरवासीयांना सन्मान मिळवून देणार आहोत. शहर विकास आघाडी पक्षविरहित आघाडी असून मी व नगरसेवकपदाचे उमेदवार नारळ निशाणीवर जनतेकडे मत मागत असल्याचे श्री. पारकर यांनी सांगितले.
११ वर्षे तुम्ही कणकवली मतदार संघाचे आमदार आहात. मग कणकवली शहराचा विकास केला नाही, असा सवाल पारकर यांनी करतानाच माझ्या आई-वडिलांचे निधन झाले तेव्हाच समीर नलावडे आणि राणे माझ्या घरी आले होते. आम्ही दोघे राजकीय तडजोडीसाठी कुठेही भेटलो नाही आणि बैठकही घेतली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी मंत्री राणेंनी केलेल्या आरोपावर पारकर यांनी
दिले.
राजन तेली तेली म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकनाथ शिंदे आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कणकवली शहराच्या विकासाची जबाबदारी आमदार निलेश राणे यांनी घेतली आहे.
त्यामुळे संदेश पारकर हे एकतर्फी निवडून येतील, असे वातावरण आहे. न. प. निवडणुकी कोणाही बोगस मतदार करू नये. आघाडीच्या हाती सत्ता दिल्यानंतर शहरवासीयांच्या मनात असलेले शहर आम्ही विकसित करणार आहोत. ५ वर्षांत गार्डन, स्टेडियम, नाट्यगृह, ड्रेनेज सिस्टिम सुधारण्यावर आमचा भर आहे. शहराच्या विकासासाठी मंत्री एकनाथ शिंदे, आम. निलेश राणेंनी निधी देण्याचे कबुल केले असल्याचे तेली यांनी सांगितले.
