सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी केला भाजप प्रवेश

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली दि ६ ऑक्टोबर (प्रतिनिधी)

सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी केला भाजप प्रवेश

सातरल- कासरल येथील उबाठा सेनेच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश केला. या सर्व उबाठा च्या कार्यकर्त्यांचे ओम गणेश निवासस्थानी भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.सातरल चे माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश चंद्रकांत मेस्त्री, राजेंद्र बाबू कदम, तृप्ती मेस्त्री यांनी यावेळी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर आणि कार्यप्रणालीवर प्रभावित होवून भाजप मध्ये प्रवेश केला.

यावेळी उपस्थित भाजपचे स्थानिक पदाधिकारी उप सरपंच संकेत राणे,माजी सरपंच प्रदीप जगन्नाथ राणे, सोसायटी चेअरमन दत्ताराम आमलोसकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष सुशील राणे, ग्रामपंचायत सदस्य रामदास दळवी,सोसायची सदस्य चंद्रकांत राणे, सोसायटी सदस्य विनोद परब, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव राणे, भाजप कायदा सेलचे पदाधिकारी वकील प्रसाद सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुशील तिर्लोटकर, शैलेश राजाराम जाधव,शैलेंद्र जाधव, कासरल तंटामुक्त अध्यक्ष गुरुनाथ भामले, आदी उपस्थित होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संदेश उर्फ गोठ्या सावंत तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर , तालुका उपाध्यक्ष महेश गुरव ,युवक जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश सावंत,सदा चव्हाण आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *