उबाठाला भाजपचा जोरदार दणका! सातरल सरपंच सविता मेस्त्री भाजपामध्ये ; स्थानिक ग्रा.प सदस्यांसह उभाठा पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश 

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली( प्रतिनिधी)

उबाठाला भाजपचा जोरदार दणका! सातरल सरपंच सविता मेस्त्री भाजपामध्ये ; स्थानिक ग्रा.प सदस्यांसह उभाठा पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश 

भाजपचा भगवा फडफडला….! मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मोठा प्रवेश सोहळा

उबाठातील कार्यकर्ते भाजपच्या गोटात! संघटन बळकट करण्यास मिळाली चालना

सातरल गावातून भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य शाखाप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

कणकवली तालुक्यातील सातरल गावातून मोठ्या प्रमाणावर उबाठा शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. सातरल ग्रामपंचायत सरपंच सौ. सविता यशवंत मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य साक्षी राणे, उपविभाग प्रमुख रुपेश राणे, शाखाप्रमुख सुहास राणे, बूथ प्रमुख संदीप राणे, तसेच शाखाप्रमुख अक्षय राणे (सातरल) यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले.

या पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडले.

या वेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये सुभाष राणे, अक्षय राणे, अमित राणे, मी राणे, रवींद्र राणे, सदानंद राणे, उत्तम राणे, किशोर मेस्त्री, स्वप्नील मेस्त्री, संतोष राणे, केशव राणे, वैशाली मेस्त्री, किशोरी मेस्त्री, मनीषा मेस्त्री, अभिनव राणे, योगेश मेस्त्री आणि शंकर मुळे यांचा समावेश होता.

 

या कार्यक्रमास भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये गोट्या सावंत, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, महेश गुरव, प्रदीप राणे, दत्ताराम आंब्डोस्कर, संकेत राणे, समीर राणे, चंद्रकांत राणे, सुशील राणे आणि राजेश मेस्त्री यांचा समावेश होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *