कणकवली (प्रतिनिधी)
कणकवलीत उमेद मार्टचे पालमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
कणकवली पंचायत समिती येथील महाराष्ट्र राज्य ग्राङ्कीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद मार्ट या महिला स्वयंसहाय्यता समूह उत्पादनांच्या संकलन व विक्री केंद्राचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. सदर संकलन व विक्री केंद्राची जास्तीतजास्त प्रसिद्धी करा. जेणेकरून विक्रीही वाढेल, अशी सूचना ङ्कंत्री राणे यांनी केली. यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर,प्रकल्प संचालक उदय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गटविकास अधिकारी अरूण चव्हाण,विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री तसेच पं. स. चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुणवाहिका मंजूर झाल्या असून त्याचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले.
