पाण्याच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर ; डॉ. श्रीकृष्ण पारकर यांना डॉक्टरेट,विशेष गौरव पुरस्कार प्रदान

0 minutes, 6 seconds Read

 

मुंबई (वृत्तसंस्था)

 

 

 

पाण्याच्या संशोधनावर आंतरराष्ट्रीय मोहोर ; डॉ. श्रीकृष्ण पारकर यांना डॉक्टरेट,विशेष गौरव पुरस्कार प्रदान

 

 

 

यु आर एज्यूकनेक्ट (UREDUCONNECT), दिल्ली या आंतरराष्ट्रीय मानांकित सेवाभावी संस्थेमार्फत आयोजित भव्य इंडो-युरोपियन समिट (INDO-EUROPEAN SUMMIT)आणि पुरस्कार सोहळा पार पडला.या सोहळ्यामध्ये हिल अॅकॅडमी, कॅनडाच्या प्रमुख समुपदेशन डॉ. राखी कलेस्कर, महिला आंतरराष्ट्रीय नेटवर्क च्या संचालिका सौ. रेखा तिवारी, पेटीयम चे कायदा सल्लागार डॉ. रुहेल चौधरी तसेच यु आर एज्यूकनेक्ट चे सर्वेसर्वा व्यवस्थापक राकेश मित्तल या सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

 

कार्यक्रमात पुण्याचे श्रीकृष्ण सुहास पारकर यांना त्यांच्या पाणी व्यवस्थापन या विषयावर सातत्याने केलेल्या संशोधनासाठी (THE THAMES INTERNATIONAL UNIVERSITY, FRANCE) द थिमस् आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, फ्रान्स यांनी विशेष डॉक्टरीट सन्मान प्रदान केला.
डॉ. श्रीकृष्ण पारकर हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली चे असून आता पिंपरी, पुणे येथे वास्तव्यास आहेत. पिण्याच्या पाण्याला अल्कलाईन व अँटीऑक्सिडंट दर्जा प्राप्त करून त्या पाण्याचे गुणधर्म सातत्याने टिकवून ठेवण्याची किमया डॉ. पारकर यांनी केली. त्यांच्या या अथक परिश्रमाचे व सातत्याचे जाण ठेवत इंडो-युरोपियन समिट (INDO-EUROPEAN SUMMIT) मध्ये डॉ. पारकर यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पाणी सामान्य जनतेच्या तळाघरात पोहचून सगळ्यांना निरोगी व आरोग्यदायी जीवन जगता येईल अशी मनीषा त्यांनी बाळगली आहे.डॉ. श्रीकृष्ण पारकर हे त्यांच्या यशाचे श्रेय त्यांची जीव तोड मेहनत कुलदेवी माता तुळजाभवानी तसेच सर्व शुभचिंतक मित्र व परिवारांना देत आहेत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *