oplus_4194304

सत्तेचा माज करणाऱ्या अशा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा धडा द्यावा – विनायक राऊत 

 

 

देवगड  (प्रतिनिधी)

सत्तेचा माज करणाऱ्या अशा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा धडा द्यावा – विनायक राऊत 

 

विरोधी ग्रा.पं.ला निधी देणार नाही, असे वक्तव्य करून पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे.त्यांच्यासमोर लाचार होणाऱ्यांना फक्त निधी मिळेल. लोकशाहीचे मंदीर म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहतों याच लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या ग्रामपंचायतींना सापत्नपणाची वागणूक नितेश राणे हे देत आहेत.या कृतीचा आपण निषेध करीत असून विरोधी ग्रामपंचायतींना सत्ताधाऱ्यांनी निधी दिला नाही तर प्रसंगी न्यायालयाकडे दाद मागणार असा इशारा उबाठा शिवसेना पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला.सत्तेचा माज करणाऱ्या अशा मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकशाहीचा धडा द्यावा, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

          देवगड तालुका उबाठा शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी खासदार विनायक राऊत हे बोलत होते.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख रविंद्र जोगल, जयेश नर,युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर,महिला आघाडीप्रमुख सौ.हर्षा ठाकूर,सायली घाडीगावकर, माजी सभापती रेश्मा सावंत, प्रतिक्षा साटम, निनाद देशपांडे आदी उपस्थित होते.

         राऊत म्हणाले, आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा सैतानांच्या हातात गेला आहे.मीच करीन ती पुर्वदिशा अशी सत्तेची मस्ती आली असून विचारी लोकांच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्तेची मस्ती डोक्यात गेल्याने नितेश राणे हे उबाठा शिवसेना पक्षाच्या सरपंचांना निधी देणार नाही असे वक्तव्य करीत आहेत.लाचारांना निधी देणार परंतू लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरपंचांना निधी देणार नाही.या वक्तव्याचा निषेध करीत असून शासकीय निधी ही वडीलोपार्जित मिळकत नाही तर जनतेच्या करातून डीपीडीसीला फंड मिळतो.निधी दिला नाही तर प्रसंगी न्यायालयात जाणार असा इशारा राऊत यांनी दिला.

 

मंत्रीमंडळात सत्तेची गुर्मी असणाऱ्या हैवानांना मुख्यमंत्र्यांनीच आता लोकशाहीचा धडा द्यावा असा टोला राऊत यांनी लगावला.नवीन ठेकेदारांनी काम करूनही दोन दोन वर्षे त्यांची बीलेच मिळाली नाहीत.ते कर्जबाजारी झाले आहेत.पैसे असूनही त्यांना न देणारे सरकार असाच उल्लेख करावा लागेल.तत्कालीन बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण केले मात्र प्रवाशांच्या हिताची कामे केली नाहीत.प्रवाशांच्या बैठकव्यवस्थेकडे दुर्लक्ष केले.या कामातून ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळाली किमान ७० कोटी रूपये सत्ताधाèयांनी कमविले असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.प्रथम थकीत असलेल्या ठेकेदारांची बीले भागवा.

मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांचा मासे मारणाऱ्या च्याच हाती माशांचे पडाव आले आहे.एलईडी मच्छिमारीवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला तरी एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या नौका राजरोस मच्छिमारी करीत आहेत.याना मच्छिमारांचा कळवळा नाही तर धमकी देवून एलईडी मच्छिमारीकडून टक्केवारी मिळवायची आहे असा आरोप राऊत यांनी केला.आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी आपण प्रयत्न केले व या प्रकल्पाचे काम सुरू झाले मात्र राज्यकत्र्यांचा दुर्लक्षपणामुळे हा प्रकल्प जो ससून बंदरानंतरचा देशातील पहिलाच मोठा प्रकल्प अद्याप काम पुर्णत्वास गेले नसल्याने कार्यान्वित झाला नाही.नारायण राणे यांच्या कारकीर्दीतील अनेक प्रकल्प बंद होते ते आपण मार्गी लावले.

                        मात्र चिपी विमानतळ सुरू करूनही या विमानतळावरून वाहतुक आता १०० टक्के बंद आहे.माणगाव खोऱ्यातील हत्ती हटाव मोहिम १२ दिवसात राबविली.आपल्या कार्यशैलीने अनेक कामे मार्गी लावली.जनसेवेचा, लोकसेवेचा हा वसा अहोरात्र सुरू ठेवणार आहे.गेले त्यांची व्याच्यता नाही.जे उबाठा शिवसेनेसोबत राहीले त्या पाचही नगरसेवकांचे कौतुक आहे.ज्या ठिकाणी गेलात त्या ठिकाणी आता भांडणे सुरू होणार आहेत.परंतू गेल्या घरी सुखी राहा असा सल्ला राऊत यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या कार्यकर्त्यांना  दिला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *