वैभववाडी (प्रतिनिधी)
तब्बल १४ महिन्यानंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू…
तब्बल १४ महिन्यानंतर करूळ घाटातून सोमवारपासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशी, वाहतूकदार, व्यापाऱ्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एस टी महामंडळाला अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनाकडून पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे एस. टी वाहतूक अद्याप सुरु झालेली नाही. करूळ घाटाच्या नूतनीकरणासाठी गेल्यावर्षी २२ जानेवारी पासून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. सुरवातीला ३१ मार्च २०२४ पर्यंत घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानंतर घाटातील कामाचा आढावा घेत प्रशासनाकडून वाहतूक सुरु करण्याच्या तारीख पे तारीख देण्यात आल्या. मात्र प्रशासन त्या त्या तारिखला घाट मार्ग सुरु करू शकले नाही. त्यामुळे सर्वाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत उबाठा सेनेकडून घाट सुरु करण्यासाठी घाटाची पाहणी करून आं इशाराही दिला होता.
