कणकवली येथे शिक्षकांसाठी ‘शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळा’ संपन्न ; प्रसिद्ध गणिततज्ज्ञ पंढरीनाथ राणे यांचे मोलाचे मार्गदर्शन

  ​कणकवली (तुळशीदास कुडतरकर)   महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (शाखा-कणकवली) आणि पंचायत समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेला ‘शिष्यवृत्ती एकदिवसीय मार्गदर्शन वर्ग’ आज शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी प.पू. भालचंद्र महाराज सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.   ​कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध गणिततज्ज्ञ पंढरीनाथ राणे उपस्थित होते. शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना […]

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत समता संवाद यात्रा कार्यक्रम संपन्न

  कणकवली (तुळशीदास कुडतरकर) “समाजबंध” ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सामाजिक संस्था असून ती प्रामुख्याने मासिक पाळी, आरोग्य व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. या संस्थेमार्फत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १ जानेवारी ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘समता संवाद यात्रा’ कोकण विभागातील मोजक्या शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहे.   वार- गुरुवार, दिनांक- […]

बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण–डांबरीकरण कामाचा शुभारंभ

  देवगड (प्रतिनिधी) दाभोळे बौद्धवाडी सड्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ देवगड मंडल भाजप तालुकाध्यक्ष राजा भूजबळ यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. दाभोळे गावचे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून दाभोळे गावातील अनेक विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेत गावाच्या विकासाला गती देण्याचे काम हाती घेतले आहे.   या […]

तारामुंबरी परिसरात बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर वनविभागाची गस्त ; ग्रामस्थांना दक्षतेचे मार्गदर्शन

  देवगड ( हेमंत पेडणेकर )   आज रोजी मौजे तारामुंबरी, देवगड येथील बिबट्यावावर क्षेत्रात वनविभागाच्या वतीने गस्त घालण्यात आली. या गस्तीत वनपाल देवगड श्रीकृष्ण परीट, वनरक्षक ठाकूरवाडी रामदास घुगे, वनरक्षक मीठबाव आप्पासो राठोड, आर.आर.टी. टीमचे प्रतिनिधी निलेश मोरये व विठ्ठल बीडये, कांदळवन समितीचे अध्यक्ष आण्णा खवळे, प्राणीप्रेमी सुमित कुबल तसेच तारामुंबरीच्या पोलीस पाटील सौ. […]

कास गांवच्या शिरपेचात मानाचा तुरा शमिका सदु गवंडी हीची झेप

बांदा (मंगल कामत)   देशाच्या वीर जवानांच्या शौर्याची गाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ‘वीरगाथा ५.०’ या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला ठसा उमटवला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत संपूर्ण देशातून निवडण्यात आलेल्या १०० विजेत्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावी वैभव मुद्राळे आणि बांदा कास येथील शमिका सदू गवंडी या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.   शैक्षणिक […]

सिंधुदुर्गातील सर्वात मोठी ‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे 24 ते 28 फेब्रुवारीला आयोजन

सिंधुदुर्गातील सर्वात मोठी ‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे 24 ते 28 फेब्रुवारीला आयोजन   प्रथम विजेता ₹ ६,लाख ६६ हजार,६६६ तर मालिकाविरास मोटरसायकल , व इतर बक्षिसे   देवगड (प्रतिनिधी)   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरणारी आणि जिल्ह्यातील सर्वात महत्वाची म्हणून ओळखली जाणारी ‘श्री रामेश्वर प्रतिष्ठान चषक’ डे-नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट […]

गीतेश राऊत याला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तम जाण -वैभव नाईक

गीतेश राऊत यांच्या प्रचारार्थ मा.खा.विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत सांताक्रूझ येथे कॉर्नर सभा संपन्न   मुंबई (तुळशीदास कुडतरकर) शिवसेनेने कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही. मुंबईतील मराठी माणसाचा आवाज बनण्याचे काम शिवसेनेने केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून मुंबईवर होणाऱ्या अन्याविरोधात संघर्ष केला आहे. शिवसैनिक आणि मनसैनिक अन्यायग्रस्त नागरिकांची ढाल बनून नेहमी कार्यरत असतात. त्यामुळे मुंबई महापालिकेवर शिवसेना, […]

रोणापाल येथे काजू बागेला भीषण आग ; आगीमध्ये दोन ते तीन लाखांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) रोणापाल पुरण येथील मोहर आलेल्या काजू बागायतीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सदर काजू बागायती सात वर्षं झाली होती व आताच ती उपन्न देणारी होती. एकूण शेतकऱ्यांचे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.   नुकसानीमध्ये अमित नकुळ गावडे, सहदेव जयराम गावडे, तानाजी महादेव गावडे, यांच्या काजू बागायती जळून खाक झाली […]

कणकवली करांच्या प्रेमाखातर २४ जानेवारी रोजी “एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली” कार्यक्रमाचे आयोजन – समीर नलावडे

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार शुभारंभ   कणकवली | कणकवलीत लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने ‘ लहान मुलांसाठी खाऊ गल्ली ‘ या कार्यक्रमाचे आयोजन २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे करण्यात आले आहे. या खाऊ गल्ली कार्यक्रमात १ हजार मुलांना ५० रुपयांचे कुपन विविध स्टॉलवर खरेदीसाठी मोफत दिले जाणार […]

प.पू. भालचंद्र महाराज संस्थान तर्फे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जन्मोत्सवामध्ये भव्य सत्कार

  खारेपाटणच्या बाल कलाकारांमुळे कणकवलीचे नाव देशपातळीवर आचरा (अर्जुन बापर्डेकर) NCERT दिल्ली व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे ( यशदा ) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धा – 2025 मध्ये लोकसंगीत समूह वाद्य वादन या कला प्रकारामध्ये संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या […]