कसाल येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्यास मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती ; कसाल कार्लेवाडी आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने आयोजन

  कणकवली (प्रतिनिधी)   कसाल कार्लेवाडी येथील आंबेदेव मित्रमंडळाच्या वतीने महान संत गोरोबा काका यांची पुण्यतिथी बुधवार १५ एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.   याप्रसंगी […]

आचरा ग्रामपंचायतीचा असाही आदर्श ! ; आचरा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच,सर्व सदस्य व कर्मचारी यांचा मासिक सभेत शंभर टक्के करभरणा,

  आचरा-अर्जुन बापर्डेकर आचरा ग्रामपंचायत ची मासिक सभा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली इनामदार श्री देव रामेश्वर सभागृहात संपन्न झाली.या सभेत सरपंच जेरोन बस्त्याव फर्नांडिस यांनी स्वतः करभरणा करत उपस्थित सर्वांना आवाहन केल्या प्रमाणे उपसरपंच संतोष मिराशी व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी त्यांची स्वतःची सन 2026 /27 या आर्थिक वर्षाची करवसुली घरपट्टी/पाणीपट्टी शंभर […]

आशिये गावचा सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – दिलीप तळेकर ; आशिये मुख्य रस्ता ते खालचीवाडी रस्त्याचे नुतनीकरण , मजबूतीकरण या कामाचा शुभारंभ

  कणकवली (प्रतिनिधी) आशिये गाव हा कायम खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. त्यामुळे या गावाच्या विकासाची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. गावातील रस्त्यांसोबत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे कणकवली शहरालगत असलेल्या या आशिये गावचा सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केले. […]

कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर चौकाला महाराणा प्रताप चौक नाव द्या ; नगरसेवक राकेश राणे यांची मागणी ; मुख्याधिकारी गौरी पाटील व नगराध्यक्ष संदेश पारकर यांना निवेदन सादर

  कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहरातील रवळनाथ मंदिर नजीक असलेला चौक हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा भाग असून या चौकास राष्ट्राभिमान व इतिहासाची जाणीव जपणाऱ्या महान योद्धा महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक राकेश राणे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी “वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक” असे नामकरण करण्याचे निवेदन मुख्याधिकारी गौरी […]

कणकवलीत महाराणा प्रतापांना अभिवादनाचा मान ; मराठा समाजाचा उत्स्फूर्त सहभाग ; वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक’ फलकाने वेधले लक्ष

  कणकवली (प्रतिनिधी)   कणकवलीत महाराणा प्रताप पुतळ्यास मराठा समाजातर्फे अभिवादन करण्यात आले. शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास सोमवारी सकल मराठा समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मराठा समाजबांधवांनी भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.   यावेळी मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई परब, सचिव महेंद्र सांब्रेकर, पं.स. […]

कणकवलीत ८ कोटींचा टेंडर घोटाळा…! एकाच ठेकेदाराला १४२ कामे ; २१ टेंडर रद्द ! स्वीकृत नगरसेवक सत्यजित पारकर यांचा आरोप

  कणकवली (प्रतिनिधी)   नगरपंचायतीच्या विशेष सभेत प्रशासकीय काळात मंजूर करण्यात आलेली तब्बल २१ टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुमारे ८ कोटी रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक सत्यजित पारकर यांनी केला आहे. एकाच ठेकेदाराला ही सर्व कामे देण्यात आल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी घातले गेले असेही श्री. पारकर म्हणाले.   […]

हळवल परबवाडी प्रभाग क्र. ३ मध्ये गौरी परब यांनी भरला उमेदवारी अर्ज

कणकवली | तालुक्यातील हळवल ग्रामपंचायतीच्या परबवाडी प्रभाग क्रमांक ३ मधील सदस्य सान्वी गावडे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने येथे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या अनुषंगाने सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गौरी लवू परब यांनी तहसीलदार कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान यानंतर अन्य अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे गौरी परब यांची ग्रामपंचायत […]

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदच्या परीक्षेमधील पात्र उमेदवारांच्या मुलाखती १७ एप्रिल रोजी ; परीक्षेचा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त ; परीक्षेचा निकाल बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध

सिंधुनगरी (प्रतिनिधी)   सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदाच्या ७३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) मार्फत राबवण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेसाठी एकूण ५०७३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी २४८५ उमेदवार परीक्षेत उपस्थित राहिले होते. सदर उमेदवारांचा परीक्षा निकाल आयबीपीएस कडून बँकेस प्राप्त झाला आहे. सदर यादी बँकेच्या […]

कळसुली – हळवल मार्गावरील बेजबाबदारपणे होणारी डंपर वाहतूक थांबवा.! ; अपघात होता होता वाचला ; प्रसंगी रस्त्यावर उतरू ; हळवल पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा

    कणकवली (प्रतिनिधी)   हळवल येथे खडी वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे संतप्त नागरिकांनी थेट डंपर अडवला. या मार्गावर ओवळीयेप्रमाणे दुर्घटना घडू देणार नाही, असा इशारा जमलेल्या नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. शिवडाव – कळसुली परिसरातील ए. पी. सावंत यांच्या क्रेशरवरून खडी वाहतूक सुरू होती. संबंधित डंपर कणकवलीच्या दिशेने येत असताना चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन […]

तिरवडे येथे १८ रोजी घुमणारा ढोल- ताशांचा गडगडाट…; अक्षयतृतीयेनिमित्त भव्य राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धांचे आयोजन

  वैभववाडी (प्रतिनिधी)   तिरवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने श्री राधाकृष्ण मंदिर, तिरवडे (इंडुलकरवाडी)ता.वैभववाडी येथे अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंगळवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी होणारी ‘राज्यस्तरीय ढोल स्पर्धा’. श्री.राधाकृष्ण प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित ही स्पर्धा रात्री ८:०० वाजल्यापासून मंदिर परिसरात रंगणार आहे. […]