तिरवडे येथे १८ रोजी घुमणारा ढोल- ताशांचा गडगडाट…; अक्षयतृतीयेनिमित्त भव्य राज्यस्तरीय ढोल- ताशा स्पर्धांचे आयोजन

0 minutes, 4 seconds Read

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

 

तिरवडे ग्रामविकास मंडळाच्या वतीने श्री राधाकृष्ण मंदिर, तिरवडे (इंडुलकरवाडी)ता.वैभववाडी येथे अक्षयतृतीयेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे मंगळवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी होणारी ‘राज्यस्तरीय ढोल स्पर्धा’.
श्री.राधाकृष्ण प्रतिष्ठान’ तर्फे आयोजित ही स्पर्धा रात्री ८:०० वाजल्यापासून मंदिर परिसरात रंगणार आहे. मराठी संस्कृती आणि अस्मिता जोपासण्यासाठी तसेच तरुण पिढीला पारंपारिक वाद्यांशी जोडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमोद इंडुलकर यांनी सांगितले.

 

स्पर्धेतील विजेत्या संघांना पुढील प्रमाणे रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक: १०,००१/- रुपये,द्वितीय क्रमांक: ७,००१/- रुपये,तृतीय क्रमांक: ५,००१/- रुपये,उत्तेजनार्थ: २,१००/- रुपये याशिवाय उत्कृष्ट ढोलवादक, ताशावादक आणि झांजवादक यांना प्रत्येकी ५०१/- रुपयांचे विशेष बक्षीस दिले जाईल.

 

प्रत्येक पथकात १० सदस्यांचा समावेश असेल (६ ढोल, २ ताशे, १ निशान आणि १ झांज). प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी १० मिनिटांचा वेळ दिला जाईल. वादनातील जोश, लयबद्धता आणि वेशभूषा यांवर आधारित गुणदान केले जाणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, मात्र नाव नोंदणीसाठी अनामत रक्कम १०००/- रू. रोख किंवा ऑनलाईन जमा करणे अनिवार्य आहे.ही रक्कम स्पर्धकांना स्पर्धा चालू होण्यापूर्वी परत करण्यात येईल.

 

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सचिव रेगन इंदुलकर यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर यांसह राज्यभरातील ढोल पथकांना विनम्र आवाहन केले आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२६ आहे. अधिक माहितीसाठी इच्छुक पथकांनी सुमोद इंदुलकर 7738702522,रेगन इंदुलकर 9029644557,तेजस इंदुलकर 7588608068,मिथिलेश इंदुलकर 8799899010 यांच्याशी संपर्क साधावा.
विशेष सूचना – स्पर्धकांनी वरील कोणत्याही क्रमांकावर संपर्क साधून गूगल लिंक भरून आपला प्रवेश निश्चित करावा या क्रमांकांवर संपर्क साधावा.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *