तोंडवली बावशीत उबाठा सेना “खालसा” ; ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश ; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा सेनेला मोठा धक्का बसत असून तोंडवली बावशी येथे उबाठा सेनेचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे. तोंडवली बावशी येथील ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष तसेच अनेक ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमात पालकमंत्री तथा भाजप नेते नामदार नितेश राणे […]

रसिका तेंडोलकर यांना कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान 

आचरा (प्रतिनिधी) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नं.१ शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम. रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवणचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच साने गुरुजी सभागृह न्यू इंग्लिश स्कूल, आचरे येथे प्रदान करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जॅकारिएस फर्नांडिस (अध्यक्ष स्थानिक स्कूल कमिटी आचरे), प्रमुख अतिथी […]

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा पुरस्कृत उमेदवार वसंत मोरे यांचा भाजपात प्रवेश

वैभववाडी (प्रतिनिधी)   भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. नामदार नितेश राणे यांनी श्री मोरे यांचे पक्षात स्वागत केले आहे. या निवडणुकीत उबाठाला बसलेला […]

जि. प. च्या सर्व जागा जिंकणार ; नारायण राणेसाहेबांना 75 व्या वाढदिवसाची विजयगिफ्ट देणार – पालकमंत्री नितेश राणे

धरून -बांधून उमेदवार उभे करणाऱ्या उबाठाला जनता धडा शिकवेल वैभववाडीत महायुतीच्या सभेत नाम. नितेश राणे यांचा उबाठावर जोरदार हल्ला   कणकवली (प्रतिनिधी)   कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 27 वर्ष जिल्हा परिषद निवडणूक आपण जिंकत आलो आहोत. होऊ घातलेल्या जि. प. च्या निवडणुकीत 50 पैकी 50 जागा जिंकून आदरणीय नारायण […]

पवार कुटुंबीयांचे मंत्री नितेश राणे यांनी केले सांत्वन

  बारामती (प्रतिनिधी)   महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. आज भाजप आमदार व मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी दिवंगत अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नितेश राणे यांनी […]

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती जिंकणार उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी कार्यकर्त्यांचा निर्धार

कणकवली (प्रतिनिधी)   कळसुली जिल्हा परिषद मधील प्रत्येक गावांमध्ये खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यातून सर्वांगिण विकास झालेला आहे. त्यामुळे महायुतीच्या कळसुली जि.प.च्या उमेदवार शितल दळवी, कळसुली पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण गावडे व ओसरगांव पं.स.च्या उमेदवार अक्षता राणे यांचा विजय निश्चित आहे. विरोधकांचा मोठ्या मताधिक्याने पराभव होईल. या मतदारसंघात महायुती जिंकण्याचा निर्धार […]

धक्कादायक प्रकार ; मुख्याध्यापकाकडून १० ते १५ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

    सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)   एका तालुक्यातील माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या दहा ते पंधरा अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग मुख्याध्यापकाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित मुख्याध्यापकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर घटना तालुक्यातील घाटमाथ्यावरील भागात असलेल्या एका शैक्षणिक […]

कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका” ;  उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा हरकूळ बु.विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याचा भाजपात पक्ष प्रवेश

  कणकवली हरकूळ येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती कणकवली (प्रतिनिधी)   सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी अखेर ‘मशाल’ सोडून ‘कमळ’ हाती घेतले आहे. रविवारी कणकवलीतील हरकुळ बु. येथे झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे […]

नळ कनेक्शन आणि गतिरोधकाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी ; देवगड सडा शाळेच्या समस्यांबाबत तुषार उर्फ पी . टी. पेडणेकर यांनी वेधले लक्ष

  ​देवगड /प्रतिनिधी जि. प. शाळा देवगड सडा येथील विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त नळ कनेक्शन द्यावे आणि वाढत्या अपघातांची शक्यता पाहता शाळेसमोर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी देवगड जामसंडे शहर प्रमुख तुषार (पी.टी.) विजय पेडणेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.   ​सदर शाळेत अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. सध्या असलेले पाणी अपुरे […]

फ्रेंडस् सर्कल देवगड सडा आयोजित भव्य कॅरम स्पर्धेचा निकाल जाहीर

  देवगड / प्रतिनिधी   फ्रेंडस् सर्कल- देवगड सडा यांच्यावतीने राधाकृष्ण रिट्रीट येथे नुकत्याच पार पडलेल्या भव्य कॅरम स्पर्धेत एकेरी गटात विकास कुळकर्णी यांनी, तर दुहेरी गटात योगेश कोळी व मेषक राणे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे उद्घाटन फ्रेंडस् सर्कल मंडळाचे ज्येष्ठ सभासद प्रवीण नळेकर व किरण कुर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला […]