मुंबई विद्यापीठ स्पर्धेत आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा पोवाडा द्वितीय

  आचरा–अर्जुन बापर्डेकर मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत आयोजित “उडान महोत्सव – २०२६” अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन पोवाडा स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई संचलित, आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे.   सदर स्पर्धा […]

शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण या प्रशालेला A+ श्रेणी प्राप्त

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत करण्यात आले प्रशालेचे अभिनंदन   कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण या प्रशालेला शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात A+ श्रेणी प्राप्त झाली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे […]

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते संजय नकाशे यांचे मित्रप्रेम जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न

स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना, सिंधुदुर्ग व संजय नकाशे मित्रपरिवार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे स्वराज्य ट्रक चालक-मालक संघटना, सिंधुदुर्ग व संजय नकाशे मित्रपरिवार यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा व श्री. संजय विठठल नकाशे यांचे मित्रप्रेम जनसंपर्क कार्यालय नूतन इमारतीचे उघ्दाटन सिंधुदुर्ग पालकमंत्री तथा मस्त्य व्यवसाय […]

कणकवलीचे ‘मराठा सांस्कृतिक भवन’ वर्षभरात पूर्ण करणार – मंत्री नितेश राणे

  ८ कोटींच्या निधीतून शहराच्या वैभवात भर; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुढील वर्षी उद्घाटनाची ग्वाही   कणकवली, (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत कणकवली शहरात भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन, कलादालन व उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी […]

छत्रपतीच्या शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे होणार भूमिपूजन ; पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा ; प्रशासकीय मान्यतेसह आठ कोटीची तरतूद केल्याचे जाहीर

दिलेला शब्द पूर्ण करायचाच’ खासदार नारायण राणे यांच्या शिकवणीतून सांस्कृतिक भवनाला गती   कणकवली | कणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे.येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता त्याच पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या जागेवर सांस्कृतिक व नाट्यगृहाचे भूमिपूजन करणार आहोत.या सांस्कृतिक व नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आठ कोटींची तरतूद आपण केलेली आहे. अशी […]

वरवडे फणसवाडी येथे 19 फेब्रुवारीला सदगुरु मित्र मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा होणार

कणकवली | कणकवली तालुक्यातील वरवडे फणसवाडी येथे सदगुरु मित्र मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदा ही 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा होणार आहे त्यानिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तरी सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आवाहन सदगुरु मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

फोंडाघाटचा शुभम हळदीवे मुंबई विद्यापीठाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत झळकला !

  वैभववाडी | डोंबिवली येथील प्रगती कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समध्ये पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत वैभववाडीच्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील शुभम धनंजय हळदीवे याने घवघवीत यश संपादन केले आहे. ​ठळक मुद्दे : ​वजन गट: ६० किलो वजन गटात सहभाग. ​स्पर्धक संख्या: ५५ स्पर्धकांमधून पटकावला पाचवा क्रमांक. ​शिक्षण: शुभम हा विज्ञान शाखेच्या […]

पोयरे मश्वीवाडी येथे भीषण आगीत कलमबागा जळून लाखोंचे नुकसान तहसीलदार आर. जे. पवार यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

आचरा–अर्जुन बापर्डेकर देवगड तालुक्यातील पोयरे मस्वीवाडी येथे शनिवारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे चाळीस एकर क्षेत्रावरील अनेक आंबा बागायतदारांच्या धरत्या कलम बागा जळून लाखोंचे नुकसान झाले आगीने रौद्र रुप धारण केले होते. आगीची तीव्रता एवढी होती की लागलेली ही आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीचे रौद्ररूप पाहता ती आटोक्यात येत नव्हती. […]

कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर ; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ; पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा 

  आंबा-काजू शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची दिली मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती    कणकवली (प्रतिनिधी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री नितेश राणे यांनी ठामपणे मांडला. यावर्षी आंबा मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बागायतदारांवर आर्थिक संकट ओढवले असल्याची माहिती मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आली.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा सविस्तर अहवाल […]

अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांची आचरा रामेश्वर मंदिराला भेट

  आचरा-अर्जुन बापर्डेकर अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानातील नित्य दैनंदिन पुजा अर्चा वमठातील वार्षिक साजरे होणारे सण यांची माहिती सर्वांना समजावी.स्वामी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सदीच्छा भेट घ्यावी या उदात्त हेतूने सिंधुदुर्ग मध्ये आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी आचरा येथील रामेश्वर मंदिरास भेट देवून रामेश्वर देवाचे दर्शन घेतले..यावेळी रामेश्वर देवस्थान समितीचे सचिव […]