पोयरे मश्वीवाडी येथे भीषण आगीत कलमबागा जळून लाखोंचे नुकसान तहसीलदार आर. जे. पवार यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

आचरा–अर्जुन बापर्डेकर

देवगड तालुक्यातील पोयरे मस्वीवाडी येथे शनिवारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे चाळीस एकर क्षेत्रावरील अनेक आंबा बागायतदारांच्या धरत्या कलम बागा जळून लाखोंचे नुकसान झाले आगीने रौद्र रुप धारण केले होते. आगीची तीव्रता एवढी होती की लागलेली ही आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले.

मात्र, आगीचे रौद्ररूप पाहता ती आटोक्यात येत नव्हती. अखेर देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी ऐन इलेक्शन धामधूमीतही तत्परता दाखवत देवगड नगरपंचायतीची अग्निशमन दलाची गाडी उपलब्ध करून दिली, ज्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

यात अनेक कलम बागायतदारांच्या फलधारणा झालेल्या कलम बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.काही। कलमांच्या खाली कै-यांचा सडा पडला होता.यात तेजस मयेकर ३००, रुपेश पाटील १२,नंदू पाटील १३,विलास पाटील २०,मनोहर राणे११,संभाजी राणे १०,मीना पाटील १५,वसंत पाटील १२,गीता मालपेकर ७,,राजेश वळंजू २५,मधू सावंत ४,राणे३ यांंची कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

तहसीलदार यांच्या आदेशाने तलाठी सुभाष नाडे, पोलिस पाटील संतोष केसरकर आणि कृषी सेवक मापारी यांनी भेट देवून नुकसानीचा पंचनामा केला..या घटनेत बागायतदारांच्या मेहनतीचे फळ असलेल्या आंबा कलमांचे अंदाजे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *