शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण या प्रशालेला A+ श्रेणी प्राप्त

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत करण्यात आले प्रशालेचे अभिनंदन

 

कणकवली (प्रतिनिधी)

कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण या प्रशालेला शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत बाह्य मूल्यांकनात A+ श्रेणी प्राप्त झाली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण (SQAAF) कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सन २०२४-२०२५ मध्ये राज्यातील 1,02,675 शाळांनी स्वयं मूल्यांकन पूर्ण केले त्यामध्ये २०२५- २०२६ मध्ये 10,644 शाळांची निवड झाली.

विशेष बाब म्हणजे बाह्य मूल्यांकनानंतर त्रयस्थ पक्षाद्वारे (THIRD PARTY ASSESMENT) मध्ये ४२९ शाळांना अ (A+) श्रेणी प्राप्त झाली आहे त्यामध्ये राज्यातील अ (A+) श्रेणी प्राप्त झालेल्या शाळांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा म्हणून शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग यांची निवड करण्यात आली आहे.

त्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी आणि शाळेला अ (A+) श्रेणी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे डॉक्टर हेमंत वसेकर,भा. प्र. से. संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे.यांच्या मार्फत मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रशालेच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री.रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, विश्वस्त यांनी प्राचार्य श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, सर्व शिक्षक, कर्मचारी वर्ग,विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांचे प्रशाळेच्या वतीने आभार मानले आहेत.

या यशामुळे शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण यांची शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील ओळख अधिक दृढ झाली आहे. शेठ न. म. विद्यालय खारेपाटण यांना मिळालेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *