सावंतवाडी (प्रतिनिधी)
मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन
दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव बुधवार १९ फेब्रुवारी रोजी मळगाव येथे साजरा होत आहे. मळगाव येथील भिल्लवाडी गृप, ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
