सावंतवाडी (प्रतीनिधी) शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे ठरली ; द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेतील उपविजेती शिरोडा वेळागरवाडी येथील मालिनी मदन अमरे पुणे – आळंदी येथे संपन्न झालेल्या द रॉयल पेजेंट मिस महाराष्ट्र 2024 स्पर्धेत उपविजेता पदावर नाव कोरले. ही स्पर्धा सई तापकीर द रॉयल पेजेंट प्रोडक्शन यांनी आयोजित केली होती. […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) यश भरत परब यांना आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात सिल्वर पदक भालावल गावचा सुपुत्र असलेला मुंबईस्थित यश भरत परब याने आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत ७४ किलो वजनी गटात सिल्वर पदक पटकावले. तसेच या स्पर्धेच्या विविध प्रकारात यश परब याने एक गोल्ड मेडल […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विलवडे शाळा येथे संपन्न नुकत्याच बांदा केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा विलवडे नं.1 शाळेच्या भव्यदिव्य पटांगणावर व सांस्कृतिक महोत्सव बांदा क्रेंद्रशाळेच्या रंगमंचावर नूकताच संपन्र झाला. कबड्डी लहान गट स्पर्धेत कुमारी रुही सावंत हिने विलवडे संघासोबत खेळताना नेत्रदीपक कामगिरी करुन संघाला अंतिम विजेतेपद मिळवून दिले.तर बांदा येथे संपन्र झालेल्या सांस्कृतिक महोत्सवात […]
देवगड (प्रतिनीधी) अडीच वर्षांनी विषय समिती सभापती पदी भाजपची वर्णी ; देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती निवडणूक देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची व महिला बालकल्याण उपसभापती पदाची निवडणुक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाखाली भाजपने बाजी मारली असून बांधकाम समिती सभापती पदी गटनेते शरद ठुकरुल, पाणीपुरवठा व जल:निसारण समिती सभापतीपदी […]
कुडाळ दि ११ डिसेंबर ( प्रतिनिधी) महादेवाचे केरवडे येथील डांगी कुटुंबियांचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले सांत्वन महादेवाचे केरवडे येथील रुपेश अनंत डांगी वय -३० हे विजवितरणच्या कंत्राटदाराकडे वायरमन म्हणून काम करत असताना रविवारी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचे दुःखद निधन झाले. त्यामुळे डांगी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी माजी आमदार वैभव […]
कणकवली दि ११ डिसेंबर ( प्रतिनिधी) कार्यकर्ते आणि जनतेच्या कामासाठी कायम उपलब्ध असणार- वैभव नाईक माणगाव, घावनळे, बांबर्डे विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मा. आ. वैभव नाईक यांच्याकडून गाठीभेटी माजी आमदार वैभव नाईक यांनी सोमवारी कुडाळ तालुक्यातील माणगाव, घावनळे, बांबर्डे या जिल्हा परिषद मतदारसंघात दौरा करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. विधानसभा निवडणुकीत पाठीशी राहिल्याबद्दल […]
वेंगुर्ले (नितिन गावडे) मालवणच्या साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम. ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली पंडित यांच्या कथा अभिवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. […]
आचरा प्रतिनिधी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या आंदोलनास सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचा जाहीर पाठिंबा सेवा निवृत्त शिक्षकांच्या दिनांक १२ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाला सेवा निवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग चा जाहीर पाठिंबा असुन या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे अशी माहिती सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघाचे उपाध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी दिली. सेवा निवृत्त […]
आचरा –अर्जुन बापर्डेकर चिंदर येथील भगवती माऊली यात्रोत्सव १४ डिसेंबरपासून चिंदर येथील श्री देवी भगवती माऊलीचा यात्रोत्सव मंगळवार दिनांक १४डिसेंबर ते १८डिसेंबर पर्यंत साजरा होणार आहे..पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बारापाच मानकरी व श्री देवी भगवती माऊली सेवा समिती चिंदर तर्फे करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी नऊ […]
सावंतवाडी (प्रतिनीधी) माडखोल गावचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षीपासून सुरूवात सुमारे २४ वर्षे स्थगित असलेला माडखोल गावचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षीपासून सुरू होत आहे. सात प्रहराच्या या हरिनाम सप्ताहाला बुधवारी विधिवत प्रारंभ झाला. गुरुवारी १२ डिसेंबरला या हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यामुळे तब्बल दोन तपानंतर माडखोल गावचे ग्रामदैवत पावणाई मंदिरात हरिनामाचा गजर घुमणार […]
