मळेवाड येथे अवैधपणे साठा केलेले खनिज महसूल कडून जप्त

सावंतवाडी (प्रतिनिधी)   मळेवाड कोंडुरे येथे जांभळीचे भरड येथील शेणमळी येथे जागा अकृषिक न करता विना परवाना खनिज साठा करून ठेवलेला असून आज मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांनी कोंडुरे पोलिस पाटील बाबुराव मुळीक, व जमीन मालक सदाशिव परब यांच्या समवेत घटनास्थळी जात पंचनामा केला.यावेळी 500 ब्रास खनिज साठा अकृषिक परवाना नसलेल्या जमिनीत साठवून ठेवला असल्याचे […]

सावंतवाडी नगरपालिका नूतन नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ शाखा सावंतवाडीच्या वतीने सत्कार

सावंतवाडी {प्रतिनीधी} सावंतवाडी नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले. नगरपालिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर समाजाच्या विविध घटकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा सत्कार सोहळा पार पडला. या प्रसंगी युवराज लखमराजे भोसले, बाळ पुराणिक (जिल्हा कार्यवाह, महाराष्ट्र ब्राह्मण […]

मळेवाड येथे तीन गाड्यांवर महसूलची कारवाई ; दोन आयवा व एक डंपरचा आहे समावेश

सावंतवाडी | दोडामार्गहून रेडीच्या दिशेने मायनिंग सदृश्य माती घेऊन जाणाऱ्या दोन आयवा व एका डंपरने होणारी वाहतूक मळेवाड जकातनाका येथे ग्रामस्थांनी रोखली. सदर गाड्यांमधून नेमकी कशाची वाहतूक होते? कुठून माल आणला व कुठे उतरण्यात येणार आहे?याबाबत विचारणा केली असता संबंधित गाडी चालकाकडून विसंगत उत्तरे देण्यात आली. यावेळी महसूल चे भरारी पथक मळेवाड जकातनाका येथे दाखल […]

मडुरा हायस्कूलची विविध स्पर्धेत विजयी घोडदौड

  बांदा (मंगल कामत) बांदा येथे पार पडलेल्या डॉ. व्ही. के. तोरसकर क्रीडा स्पर्धा व पं. नेहरू स्मृती वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कुल मडुराच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून विजयी घोडदौड कायम ठेवलीआहे. मराठी विभाग मध्ये कु. निधी कृष्णा किडजी (8वी ) उत्कृष्ठ वक्तृत्व शैलीसह प्रथम क्रमांक पटकवला. लहान गटात कु. आस्था रघुनाथ वेंगुर्लेकर प्रथम […]

जनसेवा निधी बांदाचे २०२५ चे पुरस्कार जाहीर; ४ जानेवारी २०२६ रोजी वितरण सोहळा

  बांदा | मंगल कामत बांदा व परिसरासाठी आपल्या कार्याने अजरामर ठरलेले आणि आजही आराध्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे दिवंगत डॉक्टर खानोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जनसेवा निधी बांदा या संस्थेमार्फत दिले जाणारे २०२५ सालचे विविध पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता जिल्हा परिषद केंद्र […]

मृत्यू व विवाह नोंदणी दाखला हवा तर झाड लावा दाखला मिळवा-ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी)   ग्रामपंचायत कडून विविध दाखले ग्रामस्थांना दिले जातात मात्र आता मृत्यू दाखला किंवा विवाह नोंदणी दाखल्या करिता एक झाड लावावे लावावे असा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत मुळेवाड कुंडलेकडून सुरू करण्यात आला असून याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन सरपंच सर्व मिलन विनायक पार्सेकर यांनी केले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली वृक्षतोड आणि यामुळे पर्यावरणाचा […]

मळगाव खानोलकर वाचन मंदिरात स्व.उदय खानोलकर जयंती दिनी १२ डिसेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन

  सावंतवाडी  (प्रतिनिधी) कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगावतर्फे ग्रंथालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त शुक्रवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयाच्या रमाकांत सुर्याजी खानोलकर सभागृहात स्व.उदय रमाकांत खानोलकर जयंती दिन सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.   या कार्यक्रमात स्व.उदय यांच्या सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलावंत श्री.नारायण आसयेकर हे कले विषयी विवेचन करुन दशावतार कलेचे सादरीकरण […]

भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम

भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम बांदा (मंगल कामत)   सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु.वेदा प्रवीण राऊळ हिने ६ वी ते ८ वी या गटातून ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षण विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने […]

सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी ५ हजार डिजिटल स्वाक्षऱ्या ; सोशल मिडीयावरील मोहिमेला मोठा प्रतिसाद

सावंतवाडी (प्रतिनिधी)   सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम रखडल्याबद्दल वाढती नाराजी लक्षात घेऊन रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांनी सोशल मीडियावर सुरू केलेल्या डिजिटल स्वाक्षरी मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत हजारो नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला आहे. दहा वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र दशक उलटूनही टर्मिनसचे काम […]

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक – रवींद्र चव्हाण

महायुतीतील नेत्यांसोबत चर्चा घडलेल्या काही प्रकारावर पडदा बांदा | महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे चालावं अशी धारणा आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीतील नेत्यांशी चर्चा झाली. घडलेल्या काही गोष्टींवर पडदा टाकण्याचा निर्णय झाला आहे अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. […]