कास गांवच्या शिरपेचात मानाचा तुरा शमिका सदु गवंडी हीची झेप

बांदा (मंगल कामत)   देशाच्या वीर जवानांच्या शौर्याची गाथा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या ‘वीरगाथा ५.०’ या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपला ठसा उमटवला आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत संपूर्ण देशातून निवडण्यात आलेल्या १०० विजेत्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावी वैभव मुद्राळे आणि बांदा कास येथील शमिका सदू गवंडी या दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.   शैक्षणिक […]

रोणापाल येथे काजू बागेला भीषण आग ; आगीमध्ये दोन ते तीन लाखांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) रोणापाल पुरण येथील मोहर आलेल्या काजू बागायतीला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. सदर काजू बागायती सात वर्षं झाली होती व आताच ती उपन्न देणारी होती. एकूण शेतकऱ्यांचे दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे.   नुकसानीमध्ये अमित नकुळ गावडे, सहदेव जयराम गावडे, तानाजी महादेव गावडे, यांच्या काजू बागायती जळून खाक झाली […]

मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा डॉ.सागर रेडकर यांच्या हस्ते शुभारंभ,ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

सावंतवाडी (प्रतिनिधी) गावातील गोरगरीब गरजू रुग्णांकरिता आरोग्य सेवा देता यावी या उद्देशाने ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून मोफत आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले असून याचा शुभारंभ प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ डॉ. सागर विवेक रेडकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला. गाव पातळीवर गावातील गरजू लोकांसाठी सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम […]

परमहंस भालचंद्र महाराज संस्थानची 11 जानेवारी रोजी शिष्यवृत्ती सराव परिक्षा प्रवेश प्रक्रिया पूर्ण

  एसएम हायस्कूलला कणकवली परिक्षा केंद्र    कणकवली (प्रतिनिधी)   परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित शिष्यवृत्ती सराव परिक्षा रविवार 11 जानेवारी रोजी होणार आहे. या परिक्षेची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कणकवली केंद्रामध्ये एमपीएससी परिक्षेमुळे बदल करण्यात आला असून ही परिक्षा कणकवली कॉलेज ऐवजी एसएम हायस्कुल कणकवली येथे होणार आहे. तर सावंतवाडी विभागातील […]

कणकवलीत पर्यावरणविषयक कायदेशीर साक्षरता कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी)   कणकवली तालुका विधी सेवा समिती, कणकवली व वकील संघटना, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय, कणकवली येथे दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी “Protect Today, Secure Tomorrow – Environmental Legal Literacy & Community Protection Initiative” या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणविषयक कायदेशीर साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.   कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व, पर्यावरण विषयक कायदे, […]

सावंतवाडीतील पत्रकारिता आदर्शवत – पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण

  सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकार दिन साजरा सावंतवाडी (प्रतिनिधी)   आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया रचला. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब च्या वतीने सावंतवाडीत पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलिस […]

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा आज डॉ.सागर रेडकर यांच्या हस्ते होणार शुभारंभ

सावंतवाडी (मंगल कामत)   सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून नवनवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असताना आता यातच आणखीन एक भर पडली आहे ती म्हणजे ग्रामपंचायत कडून गावातील रुग्णाकरिता धन्वंतरी मोफत आरोग्य तपासणी केंद्र सुरू करण्यात येत असून याचा शुभारंभ मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी डॉ.सागर विवेक रेडकर (हृदयरोगतज्ञ, रेडकर हॉस्पिटल धारगळ पेडणे गोवा) यांच्या […]

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर ;  ‘वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप यांना जाहीर

• मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांचीही पुरस्कारांसाठी निवड   सावंतवाडी (प्रतिनिधी)   सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै. जयानंद मठकर स्मृती […]

सिंधुदुर्गात खासदार नारायण राणेंचे जल्लोषात स्वागत 

  बांदा (प्रतिनिधी) माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचे आज सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवर पत्रादेवी येथे हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य व जल्लोषी स्वागत करण्यात आले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक […]

भोसले पॉलिटेक्निकला सलग तिसऱ्यांदा NBA मानांकन : शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब…..

बांदा (मंगल कामत) _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल व कॉम्प्युटर या चार अभ्यासक्रमांना सलग तिसऱ्यांदा एनबीए – नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रेडिटेशन प्राप्त झाले आहे. हे मानांकन १ जुलै २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या कालावधीसाठी वैध राहणार आहे. यापूर्वी संस्थेला २०१९ व २०२२ मध्येही हे मानांकन प्राप्त झाले होते.   […]