मळेवाड शिरोडा रस्त्यावर झाला होता रुग्णवाहिकेचा अपघात
सावंतवाडी – मळेवाडहून शिरोड्याच्या दिशेने जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा बुधवारी सकाळी साडे अकरा च्या सुमारास मागील टायर फुटल्याने अपघात झाला.या अपघातात गाडीची रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाला मोठी धडक बसली.यावेळी गाडीचे पुढील एअर बॅग उघडल्याने सुदैवाने चालक राजन तेली (रा. शिरोडा) हे मोठ्या दुखापतीतून बलबाल बचावले.
या अपघातात गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर शिरोडा पोलिस दुरक्षेत्रचे बीट अंमलदार प्रसाद कदम हे घटनास्थळी येऊन अपघाताचा पंचनामा केला आहे. अपघातातील जखमी राजन तेली यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
