खेळ ठरला जीवघेणा ! झोपडीबाहेर ठेवलेल्या पाण्याचा बकेटमध्ये पडून दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यु

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड : प्रतिनिधी

खेळ ठरला जीवघेणा ! झोपडीबाहेर ठेवलेल्या पाण्याचा बकेटमध्ये पडून दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यु

देवगड तालुक्यातील खाकशी तिठा येथे विजापुरी कामगारांची दोन वर्षीय मुलगी खेळत पाणी भरलेल्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये पडून बुडून मृत्यू झाल्याची ह्दय पिळवटून टाकणारी घटना १६ एप्रिल रोजी दुपारी २.३० ते ४.३० या कालावधीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार खाकशी तिठा येथे मुळ विजापूर येथील व सध्या कामानिमित्त वास्तवास असलेले सचिन जाधव कुटूंब खाकशी तिठा येथे झोपडीमध्ये राहत असून त्यांची दोन वर्षाची मुलगी पवित्रा ही बुधवारी दुपारी २.३० वा.सुमारास झोपडीच्या बाहेर खेळत होती.यावेळी झोपडीच्या बाहेर पाण्याने भरून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये खेळत असताना ती पडली.यावेळी खाली डोके वर पाय अशा स्थितीत तिला त्या बकेटमधून बाहेर काढण्यात आले मात्र काढल्यानंतर तीची काहीही हालचाल होत नसल्याने तात्काळ तिला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगीतले.

याबाबत मुलीची आई सौ.कविता सचिन जाधव यांनी देवगड पोलिस स्थानकात खबर दिली.पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *