देवगड स. ह. केळकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याची आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये निवड
श्री. स. ह. केळकर महाविद्यालयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याची आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये निवड झाली आहे. दिनांक ७ मार्च ते १७ मार्च २०२५ दरम्यान इटली येथे होणाऱ्या ७७ व्या मंडोर्लो इन फ्लोरे या आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवामध्ये श्री. स. ह. केळकर महाविद्यालय देवगडचा विद्यार्थी सुधांशू सोमन याची निवड विद्यार्थी कल्याण विभाग, मुंबई विद्यापीठामार्फत झाली आहे. सुधांशु सोमण मुंबई विद्यापीठाच्या संघामधून भारतातील विविध राज्यातील लोकनृत्यासाठी लोकगीतांचे पार्श्वगायन करणार आहे. शिक्षण विकास मंडळ देवगडचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुधांशू सोमण याचे व त्याच्या पालकांचे अभिनंदन करून इटली येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लोकमहोत्सवामध्ये सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.