सावंतवाडी : शिक्षकांचे व्यासपीठ असलेल्या शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा 2025 या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा निकाल बालदिनी जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेत अ गटात इयत्ता पहिली ते चौथी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ची विद्यार्थिनी कुमारी प्रार्थना प्रणय नाईक हिला राज्यस्तरीय बालचित्रकार पुरस्कार प्राप्त झाला. प्रार्थनाच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक रुजूल पाटणकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर मॅडम व उपमुख्याध्यापिका सौ. सुषमा पालव तसेच शाळेचा आदरणीय शिक्षक वृंद आणि शिक्षक ध्येयचे संपादक माननीय श्री मधुकर घायदार यांनी प्रार्थना असे अभिनंदन केले असून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
