देवगड/ प्रतिनिधी
मिठबाव येथे घरावर झाड पडून घराचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर देवगड तालुक्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. मुसळधार पावसासह येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे पडझडीच्या घटना घडत आहेत.
तालुक्यातील मिठबाव येथील श्रीमती श्रुतिका सतीश पवार यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या घराचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची नोंद तहसीलदार कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात 28 मि. मी. पाऊस पडला असून तालुक्यात एकूण 1349 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
