देवगड(प्रतिनिधी)
कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा राजकीय हेतू न ठेवता निव्वळ समाजकारणातून देवगड तालुक्यात दीक्षित फाउंडेशनचे विविध उपक्रम – अँड अजित गोगटे
दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, उपक्रम राबवत असताना ग्रामीण भागातील सुसज्ज स्मशानभूमीची गरज ओळखून आपल्या आर्थिक सहकार्यातून तसेच थोटम कुटुंबीय,स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आदर्श वैकुंठ धाम स्मशानभूमीची निर्मिती केली हा उपक्रम निश्चितपणे कौतुकास्पद असून प्रत्येक गावात मंदिर, व्यायाम शाळा ,वाचनालय यांची जशी आवश्यकता आहे तशी चांगली स्मशानभूमी असणे ही तेवढेच गरजेचे आहे .कोणत्याही प्रकारचे राजकारण किंवा राजकीय हेतू न ठेवता निव्वळ समाजकारणातून देवगड तालुक्यात विविध उपक्रम राबवत असताना दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांच्या योगदानातून निर्माण करण्यात आलेली करण्यात आलेली वैकुंठ धाम स्मशानभूमी ही निश्चितपणे देवगड तालुक्याला आदर्शवत ठरणारी आहे. असे प्रतिपादन माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी बाळू काका इनामदार हुर्शी गडदेवाडी वैकुंठ धाम स्मशानभूमीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.
यावेळी या वैकुंठ धाम स्मशानभूमीच्या लोकार्पण सोहळा माजी आमदार ऍड अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. कै.श्रीधर कृष्णा दीक्षित यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे नातू निरंजन निळकंठ दीक्षित यांनी स्वखर्चाने स्मशानभूमीचे संपूर्ण बांधकाम व नामकरण करीत असताना या स्मशानभूमीकरता आवश्यक असणारी जागा ही थोटम कुटुंबीयांनी देऊन तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून या वैकुंठ धाम स्मशानभूमीची निर्मिती गडदेवाडी येथे करण्यात आली. यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी आमदार ऍड. अजित गोगटे, यांच्या समवेत माजी मुख्याध्यापक अरुण सोमण ऍड. अभिषेक गोगटे, शांताराम पुजारे निरंजन दीक्षित, संतोष किंजवडेकर, रवी तिरलोटकर भूषण बोडस, ग्रामोपाध्ये लक्ष्मण करंदीकर श्री तानवडे ,रमण पटेल उपस्थित होते या निमित्ताने या वैकुंठ धाम स्मशानभूमी विधिवत शुद्धीकरण व यमपुजा पार पडली या निमित्ताने निरंजन दीक्षित यांनी प्रास्तविक केले.यावेळी महेश मराठे श्री. तानावडे ,ग्रामोपाध्ये लक्ष्मण करंदीकर रमण पटेल,यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन करून या उपक्रमाचे कौतुक केले.या निमित्ताने दीक्षित फाउंडेशनचे निरंजन दीक्षित यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी मुख्याध्यापक अरुण सोमण म्हणाले आपण केलेली कामे न सांगता कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न घेता आपलं कार्य सुरू ठेवत असताना स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने तसेच थोटम बंधू यांनी दिलेल्या जमिनीत खऱ्या अर्थाने विकसित केलेल्या या स्मशानभूमीचा पाया हे थोटम बंधू यांचा असून त्यावर इमारत उभी करण्याचं महत्त्वाचं कार्य दीक्षित फाउंडेशनच्या माध्यमातून निरंजन दीक्षित यांनी केले आहे .जीवनाच्या अखेरी निरोप देण्याची जागा उत्तम असावी हीच भावना समोर ठेवून समाजासाठी परमेश्वरासाठी आपला देव झिजला पाहिजे व जीवन समर्पित झाली पाहिजे असेच आदर्श कार्य थोटम बंधू व निरंजन दीक्षित यांनी केले असल्याचे आवर्जून सांगितले .सूत्रसंचालन आभार श्री पाटणकर यांनी मानले.
