देवगड येथे होणार शिक्षण सप्ताह साजरा

0 minutes, 0 seconds Read

देवगड येथे होणार शिक्षण सप्ताह साजरा

देवगड (प्रतिनिधी) २४ जुलै २०२४

देवगड तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शनाप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त दिनांक २२ जुलै ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह राबवणार असल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी देवगड श्रीरंग काळे यांनी दिली .
या सप्ताहात सोमवारी २२ जुलै अध्यापन साहित्य दिवस , २३ जुलै मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस २४ जुलै क्रिडा दिवस , २५ जुलै सांस्कृतिक दिवस , २६ जुलै कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस , २७ जुलै शालेय पोषण , २८ जुलै समुदाय समुह दिवस राबविण्यात येणार आहेत .याबाबतचे नियोजण करण्यात आले आहे .
हा शिक्षण सप्ताह विदयार्थी , शिक्षक , धोरणकर्ते , भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार असुन यात देवगड तालुक्यातील सर्व शाळांमधून शिक्षण सप्ताहाची अंमलबजावणी व्हावी असे आवाहन गटशिक्षण अधिकारी देवगड श्रीरंग काळे यांनी केले आहे .

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *