कणकवली दि २२ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
भाजपा युवामोर्चा कणकवली शहर चिटणीसपदी अवधुत तळगावकर यांची निवड
कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कणकवली शहर चिटणीसपदी अवधुत मोहन तळगावकर यांची निवड करण्यात आली.
