भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

0 minutes, 0 seconds Read

 

वैभववाडी (प्रतिनिधी)

भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

अवकाळी पावसाचा फटका करूळ व भुईबावडा घाटमार्गाला बसला आहे. भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर करुळ घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. करुळ घाटातून सद्यस्थितीत धिम्या गतीने वाहतूक सुरु आहे. वैभववाडी तालुक्यात गुरुवारी दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेले चार दिवस सह्याद्री पट्टयासह तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे. या अवकाळी पावसाचा सर्वानाच फटका बसला आहे. तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली आहे. नवीनच बांधण्यात आलेल्या वैभववाडी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील ठिकठिकाणी किरकोळ प्रमाणात दगडी पडण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराने दरडी हटवण्यासाठी जेसीबी आणि कामगारांची टीम तयार ठेवली आहे. त्यामुळे त्याचा वाहतुकीवर कोणता परिणाम झालेला नाही. भुईबावडा घाटात कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी कर्मचारी यांनी घाटात जाऊन जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *