बांद्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २३ लाखांची अवैध दारू जप्त, चालक फरार

0 minutes, 0 seconds Read

सावंतवाडी (प्रतिनिधी)

बांद्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; २३ लाखांची अवैध दारू जप्त, चालक फरार

एकूण ३९ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त; इन्सुली तपासणी नाक्यावर धडक कारवाई

बांदा येथील इन्सुली तपासणी नाक्यावर आज सकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत २३ लाख ९७ हजार रुपये किंमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोमधून लाकडी पॅलेटच्या आड लपवून ही दारू वाहतूक केली जात होती.

गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. टेम्पो थांबवून तपासणी केली असता, लाकडी पॅलेटखाली मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत २३.९७ लाख रुपयांची अवैध दारू, १५ लाख रुपये किंमतीचा टेम्पो आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ३९ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासणीदरम्यान, चालकाने पथकाला “मी बिल घेऊन येतो” असे सांगून गाडीतून उतरला आणि जवळच असलेल्या दुसऱ्या वाहनाचा आधार घेत पळ काढला. याप्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक विवेक कदम, जवान दीपक वायदंडे, अभिषेक खत्री, सतीश चौगुले आणि सागर सूर्यवंशी यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक विवेक कदम करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *