अक्कलकोट (स्वप्निल लोके)
हम गया नही जिंदा है ! योजना जनसेवेत अर्पण
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या १४७ साव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून समर्थ नगरी प्रतिष्ठान अक्कलकोटच्या माध्यमातून मयत झालेल्या व्यक्तीच्या गरजवंत कुटुंबास अंत्यसंस्कार तथा आधार देण्याच्या संकल्पनेतून अक्कलकोटसह राज्यभरामध्ये ही योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या योजनेच्या शुभारंभ अक्कलकोट येथे श्री स्वामीभक्त चोळाप्पा महाराज वंशज श्री वे. शा. सं.अण्णू महाराज व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे श्री प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र टाकणे, मुख्याधिकारी श्री रमाकांत डाके प्रतिष्ठित व्यापारी बसवराज माशाळे ,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, संघटनेचे पदाधिकारी सिद्राम वाघमोडे,भीमराव धडके ,कुमार पतंगे , सुभाष तारापुरे ,चंद्रप्रकाश उदगिरी, समर्थ नगरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सैन्दप्पा इंगळे ,महिला कमिटीच्या सुखदा ग्रामोपाध्ये, अश्विनी शिंपी .कावेरी धरणे आदिसह मोठ्या संख्येने स्वामीभक्त तथा अक्कलकोटवासिय ग्रामस्थ उपस्थित होते.
