संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी ‘बालसंस्कार शिबीर’ आवश्यक – सरचिटणीस रोहिदास नकाशे

0 minutes, 3 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

संस्कारक्षम पिढी निर्माण होण्यासाठी ‘बालसंस्कार शिबीर’ आवश्यक – सरचिटणीस रोहिदास नकाशे

 

कासार्डे विद्यालयात ५ दिवसीय मोफत ‘बालसंस्कार शिबिराचे’ शानदार उद्घाटन

मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळण्यासाठी तसेच आदर्श आणि संस्कारक्षम भावी पिढी निर्माण होण्यासाठी अशी संस्कार शिबिरे महत्त्वाची असतात असे गौरवोद्गार सरचिटणीस रोहिदास नकाशे यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालय काढले.कासार्डे विकास मंडळ, मुंबई संचलित कासार्डे माध्यमिक विद्यालयात आयोजित मोफत बालसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

शनिवारपासून सलग ५ दिवस शिबिर सुरू राहणार असून हे शिबीराचे चौथे वर्ष आहे.या शिबिरात दशक्रोशीमधील ६ ते १३ वयोगटात मुले- मुली सहभागी झालेले आहेत. दरम्यान कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सरचिटणीस रोहिदास नकाशे यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून शिबिराचे शानदार उद्घाटन झाले.

उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळाचे पदाधिकारी रवींद्र पाताडे,स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कूल कमिटी पदाधिकारी दिलीप शेलार,सुभाष पाताडे,प्रकाश तिर्लोटकर,प्राचार्य सौ. बी.बी. बिसुरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ.बी. बी.बिसुरे यांनी करताना या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी प्रत्येक उपक्रमात स्वतः हुन भाग घेत निखळ आनंद घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केली.

तर शिबिरातून मिळालेल्या ज्ञानाचा, विविध कौशल्याचा उपयोग भावी वाटचालीसाठी करा असे आवाहन कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी याप्रसंगी करून शिबीरासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.शिबीरात उपस्थित पाच शिबीरार्थ्यींचा प्रतिनिधिक स्वरूपात सरचिटणीस रोहिदास नकाशे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. रामचंद्र राऊळ यांनी केले. उद्घाटन समारंभाला कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होता.

सदरचे शिबिर हे नि:शुल्क असून दररोज स.८.१५ ते.स.११.१५ वा.पर्यंतचा कालावधी असून दशक्रोशीमधील ६ ते १३ वयोगटातील मुले – मुली या शिबिराचा लाभ घेऊ शकतात. हे शिबिर दि ३० एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.
शिबिरात परिपाठ,मनोरंजक खेळ,बालपणीचे खेळ,ज्युदो- कराटे,खेळातून विज्ञान, वैदिक गणित, आईसब्रेकिंग,स्टेम लर्निंग,कलावर्ग,हसत खेळत इंग्रजी,योगासने,रांगोळी, चित्रकला, विविध कलागुणदर्शन व रंगावली अशी अनेक कौशल्ये तज्ञ मार्गदर्शकामार्फत विकसित करण्यात येणार आहेत,अशी माहिती आयोजकांनी दिली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *