कणकवली भाजपा तालुकाध्यक्षपदी दिलीप तळेकर, मिलींद मेस्त्री यांची फेरनिवड

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली( प्रतिनिधी)

कणकवली भाजपा तालुकाध्यक्षपदी दिलीप तळेकर, मिलींद मेस्त्री यांची फेरनिवड

निवडी नंतर कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष 

पक्षनिरिक्षक संतोष किंजवडेकर, भालचंद्र साठे यांनी निवड केली जाहीर

भारतीय जनता पार्टी संघटन पर्व प्रक्रियेनुसार सदस्य नोंदणी प्रक्रिया पार पडली त्यानंतर भाजपा तालुकाध्य ( मंडल अध्यक्ष) निवड प्रक्रिया राज्यात एकाचवेळी रविवारी जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ मंडल अध्यक्षांची – निवड प्रक्रिया पार पडली. मंडल अध्यक्षांची निवड यादी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे कणकवली तालुकाध्यक्ष पदी दिलीप तळेकर मिलींद मेस्त्री यांची फेरनिवड पक्षनिरिक्षक संतोष किंजवडेकर , भालचंद्र साठे यांनी जाहीर केली आहे. निवडी नंतर कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. कणकवली येथील माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयात ग्रामीण मंडल अध्यक्षपदी पंचायत समिती
माजी सभापती दिलीप तळेकर तर शहर मंडल अध्यक्षपदी पंचायत समिती माजी उपसभापती मिलींद मेस्त्री यांची फेरनिवड पक्षनिरिक्षकांनी जाहीर केली. यावेळी पक्ष निरिक्षकांच्या हस्ते दिलीप तळेकर, मिलींद मेस्त्री या दोन्ही तालुकाध्यक्षांना पुढील वाटचालीस पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी बांधकाम सभापती बाळा जठार, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा उपाध्यक्ष सोनु सावंत, आशिये सरपंच महेश गुरव, शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजू हिर्लेकर, रामू विखाळे, सुशील सावंत, पंढरी वायंगणकर, विश्वनाथ जाधव,परशुराम झगडे, समीर प्रभुगांवकर कळसुली सरपंच सचिन पारधिये हरकुळ खुर्द उपसरपंच श्री. दळवी
,प्रकाश पारकर, संदीप सावंत, गणेश तळगांवकर, दादा भोगले आदींसह भारतीय जनता पाटीर्चे पदाधिकारी व व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष निवडही प्रक्रिया गेले काही दिवसापासून सुरु होती. तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. गेल्या काही वषार्तील कामकाजाचा आढावा पक्ष निरिक्षकांकडून घेण्यात आला होता. तसा अहवाल जिल्हाध्यक्षमार्फत प्रदेश कार्यालयात पाठवण्यात आला होता. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाने ही निवड प्रक्रिया पार पडली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *