देवगड मंडल भाजप अध्यक्षपदी सदाशिव उर्फ राजा भुजबळ यांची निवड ; तर पडेल मंडल बंडू नारकर

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड (प्रतिनिधी)

देवगड मंडल भाजप अध्यक्षपदी सदाशिव उर्फ राजा भुजबळ यांची निवड ; तर पडेल मंडल बंडू नारकर

देवगड तालुक्यातील भाजपाच्या मंडळ तालुकाध्यक्षांची निवड आज निवडणूक निरीक्षक संतोष कानडे यांच्या उपस्थितीत पार पडली. देवगड मंडळ तालुकाध्यक्षपदी राजा उर्फ सदाशिव भुजबळ यांची निवड करण्यात आली, तर पडेल मंडळ तालुकाध्यक्षपदी महेश नारकर यांची फेरनिवड करण्यात आली.

 

देवगड येथे राजा भुजबळ यांची निवड झाल्यानंतर माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी मंडळ तालुकाध्यक्ष राजू शेटये, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,बाळ खडपे, शरद ठूकरुल, प्रियांका साळसकर, योगेश चांदोसकर, योगेश पाटकर, दया पाटील, अध्यक्ष राजा वालकर, महेश जंगले, महिला तालुकाध्यक्ष केळुस्कर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *