आचरा-अर्जुन बापर्डेकर
आचरा तिठा येथील स्वच्छतागृहाचा शुभारंभ
आचरा तिठा येथील स्वच्छतागृहाचे उद्घाटन उपसरपंच आणि देवस्थान समिती सचिव संतोष मिराशी यांच्या हस्ते झाले.यावेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस, शिवसेना मालवण तालुकाध्यक्ष महेश राणे,अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, महेंद्र घाडी,चंदू कदम यांसह अरुण घाडी,विजय कदम गुरुप्रसाद कांबळी, श्रीपाद सावंत,सचिन सारंग,संजय आचरेकर, चंद्रशेखर सुतार,सुशील धुरी, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब,गिरीधर आपकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
आचरा तिठा येथे प्रवाशांच्या सोयीसाठी आचरा ग्रामपंचायत तर्फे स्वच्छता गृह बांधण्यात आले होते. मधल्या काळात या स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली होती.याबाबत आचरा ग्रामपंचायतीतर्फे सदर स्वच्छता गृहाचे नुतनीकरण करून सर्व सोयींनी सुसज्ज असे बनविण्यात आले आहे.यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
