शिवसेना पक्ष वाढवू नका, असे कोणीही सांगू शकत नाही -मंत्री उदय सामंत 

0 minutes, 4 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

शिवसेना पक्ष वाढवू नका, असे कोणीही सांगू शकत नाही -मंत्री उदय सामंत 

कणकवली विधानसभेत ५० हजार सभासद करा; शिवसेना पक्षाची सभासद नोंदणी शुभारंभ

आपली महायुती आहे, शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री यांच्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ८० पैकी ६० आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातही जरी महायुती असली तरी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा हक्क आहे. कणकवली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात ५० टक्के सभासद नोंदणी ही शिवसेनेची झाली पाहिजे. या मतदारसंघात जरी आमदार शिवसेनेचा नसला तरी संपर्क मंत्री म्हणून निधी देण्याची जबाबदारी माझी राहील. त्यामुळे शिवसेना पक्ष वाढवू नका, असे आम्हाला कोणीही सांगू शकत नाही अशा विश्वास शिवसेना संपर्क मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. महायुती म्हणून आपण सर्वांनी एकत्र येवून काम करण्यासाठी कामाला लागा असे आवाहनही त्यांनी केले.

 

 

कणकवली येथील शिवशक्ती मंगल कार्यालय येथे शिवसेना सभासद नोंदणी मोहीमेच्या शुभारंभ
प्रसंगी ते बोलत होते, यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत, उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय पडते, रुपेश पावसकर, विलास साळसकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रशेखर राणे, खजिनदार भास्कर राणे, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत, तालुका समन्वयक सुनील पारकर, बाळू पारकर, पावसकर, तालुका प्रवक्ता मंगेश गुरव, विश्राम सावंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, महिला कणकवली तालुकाप्रमुख प्रिया टेंबकर, राऊत, साक्षी प्रभू, फोंडाघाट सरपंच संजना आग्रे, उपस्थित होते.

 

 

मंत्री उदय सामंत म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची एवढी ताकद आपण निर्माण केली पाहिजे, जेणेकरून सर्वांना दखल घ्यावी लागेल. नगरपंचायत निवडणुकीत इतिहासात आपण देवगड नगरपंचायत जिंकलो. अनेकदा वैभववाडी, देवगड कुडाळ यासारख्या नगरपालिकांमध्ये अपयश येणार असे सांगत होते, तरीदेखील शिवसेना जिंकली आता माज्याकडे येताना गावात सभासद किती झाले? त्याची आकडेवारी द्या, नंतरच विकासकामे केली जातील कुडाळ मध्ये आ. निलेश राणे, सावंतवाडीत दीपक केसरकर आमदार आहेत. या मतदारसंघात आमदार जरी नसला तरी चांगला निधी मिळवून दिला जाईल. पालकमंत्री नितेश राणे यांना मी स्वतः भेटेन. जरी मी ५ वेळा निवडणून आलेलो आमदार असलो तरी या जिल्ह्याचे ते पालकमंत्री असल्याने निधी वाटपाचा प्रश्न मार्गी लावला जाईल.

 

 

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहेत, आपल्याला सगळ्या निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी कणकवली मतदार संघात ५० हजार मतदार नोंदणी झाली पाहिजे. १५ दिवसांनी आढावा घ्यायला येणार आहे, त्याष्टष्टीने सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी नियोजन करा. गावनिहाय नियोजन केलं पाहिजे.मी जरी रत्नागिरीचा पालकमंत्री असलो तरी शिवसैनिक म्हणून सभासद नोंदणी करण्यासाठी गेलं पाहिजे. मतदार यादी समोर घेऊन सभासद नोंदणी करु नका. प्रत्येक गावातून ५० टाक्यापेक्षा जास्त सभासद झाले पाहीजेत. सिंधुदुर्ग जिल्हा हाच शिवसेनेचा बालेकिल्ला झाला पाहिजे. आता ख-या अथार्ने आ. निलेश राणे, दीपक केसरकर यांचे नेतृत्व आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्गात नंबर १ चा पक्ष बनवण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. पालकमंत्री नितेश राणे हे देखील माज्या मतदार संघात येऊन काम करताहेत. रत्नागिरीत त्यांनी सभासद नोंदणी किंवा पक्ष बांधणी संदर्भात बैठका घेतल्या. ते त्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत , तसाच मी या जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे. त्यामुळे कुणालाही बंधन घातलेले नाही. मी आज कणकवलीत आलो आहे, आपला पक्ष वाढला पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आहे, आपले अस्तित्व दाखवण्यासाठी सभा झाली पाहिजे. संपर्क मंत्री असल्याने काही पदांना मी स्थगिती देणार आहे. कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज आहे. स्वतःची मानसिकता काय आहे? हे पाहण्याची गरज आहे. आपले महिला पदाधिकारी आहेत त्यांनी काम केलं पाहिजे. महिलांना ख-या अथार्ने मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी एसटी प्रवास ५० टक्के, लाडकी बहीण योजना आणत न्याय दिला आहे. सगळी महिलांची सभासद नोंदणी केली पाहिजे. कार्यकत्यांनी आपण आपले कार्यक्षेत्र निवडलेले पाहिजे, पक्षाचे किती काम करतो, आपण सभासद नोंदणी केली आहे? हे पहा. आपण निवडणुका जिंकण्यासाठी काम केले पाहिजे. युवासेनेने देखील सभासद नोंदणी मोठ्या संख्येने केली पाहिजे.

 

 

मतभेद असतील दूर करु, राग रुसवे- फुगवे बाजूला ठेवा. आपण महायुती मध्ये काम करत आहोत, ही भावना महत्वाची आहे. तुम्ही रान उठवू शकता, काम करण्याची गरज आहे. महायुतीचा सन्मान करायचा आहे. नारायण राणे हे महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत, पालकमंत्री नितेश राणे यांचा आदर आहे. आ. निलेश राणे या सगळ्यासोबत एकत्र बसून निधीचा प्रश्न मार्गी लावला जाईल. या कार्यक्रमात उपनेते संजय आग्रे,जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत, विलास साळसकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन मंगेश गुरव यांनी केले.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *