हिंदळे चिंचवला येथील कलम बागेतून सुमारे १७ हजार ५०० रुपये किंमतीच्या ३५ पेटी कच्च्या आंब्यांची चोरी ; अज्ञाता विरोधात देवगड पोलिसात गुन्हा दाखल  

0 minutes, 1 second Read

 

 

देवगड/ प्रतिनिधी

हिंदळे चिंचवला येथील कलम बागेतून सुमारे १७ हजार ५०० रुपये किंमतीच्या ३५ पेटी कच्च्या आंब्यांची चोरी ; अज्ञाता विरोधात देवगड पोलिसात गुन्हा दाखल  

देवगड तालुक्यातील हिंदळे चिंचवला येथील कलम बागेतून सुमारे 17 हजार 500 रुपये किंमतीच्या 35 पेटी कच्च्या आंब्यांची चोरी केल्याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अविनाश श्रीपत राणे (हिंदळे राणेवाडी) यांनी दिली आहे. ही घटना 12 मार्च रोजी सकाळी 8 वा. ते 14 मार्च रोजी सकाळी 8 वा. या मुदतीत घडली आहे.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अविनाश राणे यांचे काका व कृष्णा धोंडू मेस्त्री यांची एकत्रित आंबा कलम बाग हिंदळे चिंचवला या भागात आहे. ही बाग देखरेख व आंबा फळे तोडणीकरिता फिर्यादी अविनाश राणे यांच्या ताब्यात आहे. या बागेतून 35 पेटी कच्च्या आंब्याची चोरी झाल्याचे अविनाश राणे यांच्या सोमवारी सकाळी निदर्शनास आले. याबाबत त्यांनी देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून चोरीस गेलेल्या आंब्याची किंमत सुमारे 17 हजार 500 रुपये असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणपती गावडे करीत आहेत.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *