सौ.मंदाकिनी घाटे यांचे निधन

0 minutes, 0 seconds Read

सौ.मंदाकिनी घाटे यांचे निधन

देवगड,दि.०६ एप्रिल

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या पत्नी सौ . मंदाकिनी नंदकुमार घाटे वय (७५) रा.जामसंडे यांचे उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुले,दोन मुली, जावई,सुना, नातवंडे परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककाळा पसरली आहे.

त्यांच्या निधनाने वृत्त समजताच माजी आम.अजित गोगटे,शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर ,बाळ खडपे,नगरसेवक विशाल मांजरेकर निवृत्ती उर्फ बुवा तारी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर,तालुका अध्यक्ष शैलेश कदम शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र जोगल,जिल्हा बँक संचालक ऍड प्रकाश बोडस,देवगड उर्बंनमाजी नगराध्यक्ष सौ प्रियांका साळसकर देवगड शहर विकास ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष निशिकांत साटम,हनुमान युवक क्रीडा मंडळ अध्यक्ष विलास रुमडे ,याबँक चेअरमन सदाशिव ओगले,अजिंक्य पतसंस्था चेअरमन प्रदीप मांजरेकर,देवदुर्ग संस्था चेअ रमन चंद्रकांत पाळेकर,देवगड पर्यटन संस्था अध्यक्ष प्रमोद नलावडे मत्स्यव्यवसायिक हनिफ मेमन ,श्रीपाद पारकर, कुणकेश्वर सोसायटी चेअरमन निलेश पेडणेकर,रामानंद वाळके,नागेश आचरेकर तसेच अन्य संस्था प्रतिनिधी, व्यापारी बंधू ग्रामस्थ यांनी श्री घाटे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

त्यांचेवर देवगड येथील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्याना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *