पडेल उपसरपंच यांचा भाजपात प्रवेश

0 minutes, 0 seconds Read

पडेल उपसरपंच यांचा भाजपात प्रवेश

 

देवगड (प्रतिनिधी) २ ऑगस्ट २०२४

 

तालुक्यातील पडेल ग्रामपंचायतीचे उपसरपंच, उबाठा सेनेचे विश्वनाथ पडेलकर, व पडेल व्यापारी संघटना अध्यक्ष जयेश तानावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पडेल कॅन्टीन येथील भाजपा पक्ष कार्यालयात भाजपामध्ये प्रवेश केला.
आमदार नितेश राणे गाव विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देत आहेत .आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आमदार नितेश राणे यांच्या शिवाय पर्याय नसल्याचे मत नव्याने प्रवेश केलेल्या प्रवेश कर्त्यांनी व्यक्त केलेत.
यापूर्वी पडेल या ग्रामपंचायतीवर सरपंच भाजपाचे होते. मात्र आता उपसरपंच ही भाजपाचा असल्याने पडेल ग्रामपंचायत वर भाजपाची निर्विवाद सत्ता निर्माण झाली आहे.

पडेल उपसरपंच यांच्यासोबत जगन्नाथ पडेलकर,सुदीप वारीक, सचिन पडेलकर, महादेव तानावडे, सतीश तानावडे ,दीशात तानावडे, अक्षय तानावडे, चिराग तानावडे, निखिल तानावडे, स्वप्निल तानावडे सुदीप वारी, मंगेश येदृक, अरुण पाटणकर, नंदकिशोर वारीक, संतोष तानावडे यांनीही प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *