… चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता !  

0 minutes, 0 seconds Read

 

देवगड / प्रतिनिधी

..… चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता !  

विवाहितेचा विनयभंग, फसवणूक व मारहाणप्रकरणी देवगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात अशोक प्रभूदयाळ कुमावत याच्यासह चार संशयितांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संशयितांच्यावतीने अॅड. इंद्रनील ठाकुर यांनी काम पाहिले.

 

 

विवाहितेचा विनयभंग, फसवणूक व मारहाणप्रकरणी संशयित अशोक कुमावत, श्रावणी प्रभूदयाळ कुमावत, मीनूदेवी प्रभूदयाळ कुमावत व रेखा प्रभूदयाळ कुमावत (सर्व रा. श्रीमाधोपूर, राजस्थान) यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ) (१) (२), ४२०, ३२३, ५०४, ३४ अन्वये २०२० साली देवगड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य संशयित अशोक कुमावत याने फिर्यादीला अश्लिल बोलून, तिचा हात धरून व लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली. तसेच चारही संशयितांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली, असे दाखल खटल्यातील फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

याप्रकरणी संशयितांतर्फे फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २३९ नुसार याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात फिर्यादीचा जबाब, घटनाक्रम, पोलीस तपासातील त्रुटी, विसंगती संशयितांचे वकील अॅड. ठाकुर यांनी न्यायालयासमोर सिद्ध केल्या. जे पुरावे सरकारी पक्षाने सादर केले, ते प्रथमदर्शनीच कमकुवत व विश्वासार्ह नव्हते. त्यामुळे प्रथमदर्शनी संशयित आरोपी हे निर्दोष असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढून चारही संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *