महाराष्ट्र राज्य लक्झरी बस बुकिंग एजंट संघटना यांनी बेकायदेशीर व अवैधरित्या लगेच वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस वर इन्सुलि 

0 minutes, 1 second Read

बांदा. प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य लक्झरी बस बुकिंग एजंट संघटना यांनी बेकायदेशीर व अवैधरित्या लगेच वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस वर इन्सुलि 

आज इन्सुलि RTO येथे महाराष्ट्र राज्य लक्झरी बस बुकिंग एजंट संघटना यांनी बेकायदेशीर व अवैधरित्या लगेच वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस वर इन्सुलि RTO ला आंदोलन करून कार्यवाही करण्यास भाग पाडले. या आंदोलनात जवळपास 40 ते 50 लोक उपस्थित होते. या वाहतुकी विरोधात कार्यवाही करण्यासाठी 13/ 03/ 2025 रोजी निवेदन देण्यात आले होते. व कार्यवाही न केल्यास 20/09/2025 आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण या निवेदनाला अनसूरून कुठलीही कार्यवाही RTO कडून करण्यात आली नव्हती. त्या मुळे आज बस एजंट संघटना रस्तावर उतरली व RTO ला बसेस वर कार्यवाही साठी भाग पाडले. बस मधील लगेच वाहतुकीमुळे टेम्पो व्यवसाय पूर्णपणे धोका झाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच डिकी मध्ये हे लगेच भरत असल्यामुळे प्रवाशांना त्यांचे समान सीटवर हातातच घेऊन बसावे लागत आहे.

तसेच या गाड्यांमधून दोन नंबर मालाची वाहतूक जीएसटी. चुकवून केली जाते. तसेच गाडीच्या टपावर लगेच असल्यामुळे गाडी पलटी होण्याचे चान्सेस जास्तच आहेत ह्या गोष्टी RTO चा निदर्शनास कधी येत नाहीत.ऑनलाईन बुकिंग च्या नावाखाली येथील स्थानिक एजंट यांच्या वर उपासमारीची वेळ आली असून लवकरात लवकर बांदा ते खारेपाटण येथील जे लोकल प्रवासी थांबे आहेत ते ऑनलाईन अँप वरून काढून टाकण्यात यावेत. त्यापूर्वी अनेकदा सिंधुदुर्ग चालक असोसिएशनचे अध्यक्ष विजय जांभळे यांनी वारंवार आंदोलने केली आहेत. तसेच टेम्पो वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष कृष्णाजी हंकारे यांनीही आंदोलन केले आहेत. दोनच दिवसापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांनीही आरटीओस कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले होते पण या कोणाचीही दखल आरटीओ कडून घेतली जात नाही. केवळ २०० रुपये घेऊन या वाहतूक करणाऱ्या बसेस आरटीओ कडून सोडण्यात येतात. उद्या एखादा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण. प्रवाशांच्या जीवापेक्षा 200 रुपये मोठे आहेत का असा प्रश्न मात्र सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

या आंदोलनात अध्यक्ष=जयराज राणे,उपाध्यक्ष=उदय बांदेकर हेमंत दाभोलकर,महेश मोडक,पप्पू पाटणकर, प्रकाश मेस्त्री ,सागर कांदे.अविनाश मर्तल,प्रीतम धुरत.जुबेर सरगुरु उमेश बाणे .पप्पू त्रिंबककर,फरमान काझी.यश तावडे अमित भोसले.बाळा मर्तल तसेच वाहन चालक संघटनेचे पदाधिकारी कृष्णा हंकारे. विजय जांभळे व नियाज मुजावर व अन्य लोक उपस्थित होते. ही बस मधून होणारी अवैद्य लगेच वाहतूक पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे आंदोलनकरांनी स्पष्ट केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *