मराठी भाषा निरंतर टिकवून रहावी यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने ह्या भाषेच्या संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे – गोविंद सावंत 

 

मुणगे (विश्वास मुणगेकर)

मराठी भाषा निरंतर टिकवून रहावी यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने ह्या भाषेच्या संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे – गोविंद सावंत 

महाराष्ट्राच्या साहित्य,सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कवी कुसुमाग्रज यांचे मोठे योगदान आहे.मराठी भाषेचा शिक्षणामध्ये प्रसार व्हावा मराठी ह्या बोलीभाषेला महत्वाचे स्थान मिळावे यासाठी कवी कुसुमाग्रज यानी प्रयत्न केले.परंतु उशीरा का होईना केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी हि राजभाषा असून तीचे संवर्धन आणि अधिकाधिक लेखन होण्याच्या उद्देशाने आणि मराठी भाषा निरंतर टिकवून रहावी म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने ह्या भाषेच्या संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे असे मत भगवती वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत यानी व्यक्त केले. ते वाचनालयाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते.

  श्री भगवती वाचनालय मुणगे येथे  वि.वा शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा दि.२७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ” मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात आला . २१ जानेवारी २०१३ च्या शासननिर्णया द्वारे शासनाने दिलेल्या सुचना प्रमाणे  विविध उपक्रमानी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद सावंत व उपाध्यक्ष महादेव ऊर्फ तात्या प्रभू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे कार्यकारीनी सदस्य संतोष लब्दे, मोतीराम वळंजू  तसेच वाचनालयाचे कर्मचारी  ग्रंथपाल विश्वास मुणगेकर,  सोमनाथ रुपे,तसेच वाचकवर्ग मोहन परब आदी उपस्थित होते यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना अध्यक्ष श्री सावंत यानी पुढे सांगितले की, आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या आणि संगणकीय युगातही मराठी भाषा टिकून ठेवायची असेल तर मराठी भाषेचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. इतर भाषांबरोबरच तील जोडून घेतले पाहिजे तरच मराठी भाषा टिकेल असे श्री सावंत यानी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकामधून बोलताना उपाध्यक्ष महादेव ऊर्फ तात्या प्रभु यानी सांगितले कि  वाचकांच्या मनामध्ये मराठी भाषेविषयी जाणीव जागृती आणि अभिरुची निर्माण करण्याच्या उद्देशाने वाचनालयामध्ये वेगवेगळ्या पध्दतीचे उपक्रम राबविण्यात येतात  .त्यालाच अनुसरुन आज कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने  सन् २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये खरेदी केलेल्या ग्रंथाचे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे या प्रदर्शनाचा वाचकानी लाभ घ्यावा तसेच  वाचनालयाचे सभासद होऊन वाचनालयातील ग्रंथसंपत्तीचा फायदा घ्यावा. जेणेकरून  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यानी जे मोलाचे योगदान दिले आहे.आणि मराठी हि ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. त्याचे चिज होईल. असे प्रास्ताविकामधून श्री प्रभू यानी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन आणि उपस्थित मान्यवरांचे आभार महादेव ऊर्फ तात्या प्रभू यानी मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *