आचरा श्री देव रामेश्वराच्या स्वागतासाठी हिंदळे ग्रामस्थांनी उभारलीय लक्षवेधी स्वागत कमानी

 

 

देवगड (स्वप्नील लोके)

 

 

आचरा श्री देव रामेश्वराच्या स्वागतासाठी हिंदळे ग्रामस्थांनी उभारलीय लक्षवेधी स्वागत कमानी

 

 

श्रीदेव कुणकेश्वर भेटीसाठी ३९ वर्षांनंतर निघाली इनामदार श्री रामेश्वर यांची भव्य देवस्वारी !

 

 

 

तब्बल ३९ वर्षांनंतर इनामदार श्री रामेश्वर (कसबा आचरा) यांची श्रीदेव कुणकेश्वर भेटीसाठी भव्य देवस्वारी निघाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे आचरा गावासह संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. देवस्थान कमिटी आणि आचरा ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली या देवस्वारीच्या मार्गातील गावांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, मार्गातील प्रत्येक गावाने या सोहळ्याला उत्कृष्ट सहकार्य केले आहे.

हिंदळे ग्रामस्थांचा उत्कृष्ट योगदान

 

 

हिंदळे गावाने या ऐतिहासिक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली असून बाणघाटी ते हिंदळे पूल आणि संपूर्ण हिंदळे गावाची स्वच्छता मोहिम मोठ्या जोमाने राबवली गेली. विशेष म्हणजे, कला दिग्दर्शक समील हळदणकर यांनी भंडारवाडा तिठ्यावर उभारलेले भव्य स्वागत कमान या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले आहे. हे भव्य प्रवेशद्वार पाहूनच भक्तांचे हृदय आनंदाने भरून येत आहे.

 

 

     गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 

 

हिंदळे गावाचे लोकाभिमुख सरपंच मकरंद शिंदे यांनी स्वतः या कार्यात पुढाकार घेतला असून, त्यांच्यासह अनेक गावकऱ्यांनी या सोहळ्यासाठी परिश्रम घेतले आहे .त्याच बरोबर या कार्यात कला दिग्दर्शक समील हळदणकर, राहुल पारकर, रघुनाथ तेली, गौरव तेली, दयानंद तेली, मंदार शेटये, सुनील शेटये, केदार शेटये, स्वरुप शेटये, सचिन राणे, सतीष राणे, मंगेश हिर्लेकर, प्रमोद हिर्लेकर, परेश खोत,मंगेश मयेकर, योगेश पाटील, निलेश पारकर,अथर्व मोदी, एकनाथ सावंत,संजय सावंत,अनिरुद्ध अभ्यंकर आणि सहकारी या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक सोहळा अधिक भव्य आणि सुंदर बनला आहे.

 

      गावागावातून मिळाले सहकार्य

 

आचरावासीयांसाठी ही देवस्वारी म्हणजे मोठा सण आहे. त्यामुळेच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने संपूर्ण मार्गाची स्वच्छता केली आणि सजावट केली. देवस्वारीच्या मार्गावर असलेल्या गावांनीही स्वागत कमानी उभारून, मार्ग प्रसन्न करण्याचे काम केले आहे.

परंपरेचा सन्मान आणि भाविकांचा उत्साह

 

श्रीदेव कुणकेश्वरच्या दर्शनासाठी आणि या ऐतिहासिक सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यामुळे हिंदळे ग्रामस्थ आणि आचरा परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

ही ऐतिहासिक देवस्वारी यशस्वीपणे पार पडो, अशीच सर्व ग्रामस्थांची आणि भक्तांची मनःपूर्वक इच्छा आहे !

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *