ओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला ; स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांची रात्रीच घटनास्थळी धाव

 

कणकवली ( प्रतिनिधी)

ओसरगाव मध्ये महिलेचा जळालेल्या स्थितीत मृतदेह आढळला ; स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांची रात्रीच घटनास्थळी धाव

फॉरेन्सिक तपासणी टीम कडून घटनास्थळी भेट

कणकवली तालुक्यात महामार्गावर ओसरगाव येथे एका जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पोलिसांनी महामार्गावर एमव्हीडी कॉलेजच्या पासून काही अंतरावर घटनास्थळी भेट देत पाहणी केली. रात्रीच या ठिकाणची फॉरेन्सिक तपासणी टीम दाखल झाली होती. ही महिला नेमकी कोण? तिचा घातपात की आत्महत्या? या महिलेचा घातपात करत तिला ओसरगाव मध्ये टाकले की कसे? तसेच या महिलेला या ठिकाणी टाकण्यामागची नेमकी कारणे काय? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. याबाबत कणकवली पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *