संत निरंकारी मंडळतर्फे सिंधुदुर्गात स्वच्छता अभियान ; मंदिरे, समुद्र किनारे तसेच अन्य जलस्त्रोतांच्या ठिकाणची स्वच्छता

कणकवली (प्रतिनिधी)

 

 

संत निरंकारी मंडळतर्फे सिंधुदुर्गात स्वच्छता अभियान ; मंदिरे, समुद्र किनारे तसेच अन्य जलस्त्रोतांच्या ठिकाणची स्वच्छता

 

संत निरंकारी मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने आज ‘स्वच्‍छ जल – स्वच्छ’ मन अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी आरवली वेतोबा मंदिर तळी, वेंगुर्लेतील ब्रम्‍हेश्‍वर तळी, कणकवली शहर आणि कुडाळ बांबुळी येथील गणपतीसाणा, देवगड बीच आणि नाधवडे येथील परिसर स्वच्छ करण्यात आला.

जिल्ह्यातील पाच ठिकाणच्या जलस्त्रोतांची स्वच्छता अभियानाच्या या उपक्रमामध्ये ६५० निरंकारी सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्‍यान आज एकाच दिवशी संपूर्ण देशभरात १६५० पेक्षा अधिक ठिकाणच्या जलस्त्रोतांच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात १० लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतल्‍याची माहिती संत निरंकारी मंडळ सिंधुदुर्गच्यावतीने अजिंक्‍य मुसळे यांनी दिली.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *