किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर दिल्लीला रवाना ….

0 minutes, 2 seconds Read

 

देवगड (प्रतिनीधी) 

 

किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर दिल्लीला रवाना ….

 

 

प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडसाठी विशेष अतिथी म्हणून किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांना निमंत्रण

 

प्रजासत्ताक दिन 2025 च्या दिल्ली येथील परेड साठी केंद्र शासनाच्या सूचनानुसार महाराष्ट्र राज्यातील 34 ग्रामपंचायत सरपंचांची निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत सरपंच अशा पद्धतीने ही निवड करण्यात आली आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून किंजवडे ग्रामपंचायत सरपंच श्री. संतोष किंजवडेकर यांची दिल्ली येथील परेडला उपस्थित राहण्यासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्र व राज्य स्तरावर आयोजित विविध अभियानात किंजवडे ग्रामपंचायतीने दिलेले प्रभावी योगदान आणि उल्लेखनीय कामगिरी यामुळे दिल्ली येथील परेडसाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळत असल्याचे मत श्री. संतोष किंजवडेकर यांनी व्यक्त केले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *